विद्युत खांबाचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 03:00 PM2018-09-13T15:00:35+5:302018-09-13T15:00:42+5:30

अकोला तालुक्यातील डाबकी जहागीर येथील शेत शिवारात असलेल्या इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या 35 वर्षीय युवकाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला.

Youth dies due to electric shock in akola | विद्युत खांबाचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

विद्युत खांबाचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

Next

बोरगाव मंजू /  पिंजर  (अकोला ) - अकोला तालुक्यातील डाबकी जहागीर येथील शेत शिवारात असलेल्या इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या 35 वर्षीय युवकाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मंगेश कोळंबी असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत डाबकी जहागीर गावानजीक दुधलंम रोडवर एका विद्युत पुरवठा वाहिनीच्या पोलवर एक अनोळखी इसम खांबावर मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच गावकऱ्यांनी एकच गर्दी  केली. दरम्यान या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पिंजर पोलिसांना दिली. 

ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी आपल्या  पथकासह घटनास्थळावर धाव  घेतली. तसेच पंचनामा करून सदर  खांबावरील  मृतदेह खाली उतरवला. पोलिसांनी चौकशी केली असता  हा मृतदेह कोळंबी येथील मंगेश भगवान राऊत यांचा असल्याचे  स्पष्ट झाले. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर नागलकर सह पोलीस कर्मचारी करत आहेत.

Web Title: Youth dies due to electric shock in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.