Akola: आज जागतिक वन दिवस: अकोला जिल्ह्यात केवळ ७ टक्के भूभाग वनाच्छादित, ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र

By रवी दामोदर | Published: March 20, 2023 06:13 PM2023-03-20T18:13:57+5:302023-03-20T18:15:15+5:30

World Forest Day: मुळातच जंगलक्षेत्र कमी असलेल्या पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्याचा केवळ सात टक्के भूभाग वनाच्छादित आहे. ५४३१.०० चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्र असलेल्या अकोला जिल्ह्यात केवळ ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र आहे.

World Forest Day: Akola district has only 7 percent forest cover, 378.43 sq. km forest area | Akola: आज जागतिक वन दिवस: अकोला जिल्ह्यात केवळ ७ टक्के भूभाग वनाच्छादित, ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र

Akola: आज जागतिक वन दिवस: अकोला जिल्ह्यात केवळ ७ टक्के भूभाग वनाच्छादित, ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र

googlenewsNext

- रवी दामोदर
अकोला -  मुळातच जंगलक्षेत्र कमी असलेल्या पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्याचा केवळ सात टक्के भूभाग वनाच्छादित आहे. ५४३१.०० चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्र असलेल्या अकोला जिल्ह्यात केवळ ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र आहे. जंगलाचे कमी प्रमाण हेच अकोला जिल्ह्याचे तापमान अधिक असण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी, यासाठी ‘२१ मार्च’ हा दिवस ‘जागतिक वन दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९७१ मध्ये युरोपियन कॉन्फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चरच्या २३व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना (थीम) ही ‘वने आणि आरोग्य’ आहे.

राष्ट्रीय वननीतीनुसार ३३ टक्के भूभाग हा वनाच्छादित असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यात १६ टक्के भूभागावर जंगल आहे. अकोला जिल्ह्यात हे प्रमाण आणखी कमी होते. जिल्ह्यातील तीन वने ही उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने या प्रकारात मोडतात. प्रामुख्याने अकोट, पातूर व बार्शिटाकळी तालुक्यांत घनदाट जंगलाचे पट्टे आढळून येतात. इतर तालुक्यांमध्ये मात्र फारसे वनक्षेत्र नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलक्षेत्र वाढणे गरजेचे असल्याने शासनाकडून वनसंवर्धनासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचे चांगले परिणाम दिसत नसल्याचे वास्तव आहे.
 
काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य
काटेपूर्णा अभयारण्य ७३.६३ चौरस किमी असून, येथे वनस्पतींच्या ११५ प्रजाती आढळतात. मुख्य वृक्ष प्रजातींमध्ये बेहडा, धावडा, मोह, तेंदूपान, खैर, सळई, ओला आढळतात. अभयारण्य चौशिंगी काळवीट आणि बार्किंग हरणासाठी प्रसिद्ध आहे.
 
नरनाळा वन्यजीव अभयारण्य
२ मे, १९९७ रोजी नरनाळा किल्ला व त्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. हे अभयारण्य अकोट तालुक्यात असून, १२.३५ चौ.किमी क्षेत्रावर पसरले आहे. या अभयारण्यात सांबर, बिबट्या, तसेच बार्किंग डिअर हे प्राणी प्रामुख्याने आढळतात.

Web Title: World Forest Day: Akola district has only 7 percent forest cover, 378.43 sq. km forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.