सत्तेत असताना पवारांनी का नाही सोडविले शेतकऱ्यांचे प्रश्न - बच्चू कडूंचा सवाल

By atul.jaiswal | Published: December 6, 2017 03:47 PM2017-12-06T15:47:38+5:302017-12-06T15:52:29+5:30

When Pawar was in power, the question of the farmers not being solved - Chachu Kadu's question | सत्तेत असताना पवारांनी का नाही सोडविले शेतकऱ्यांचे प्रश्न - बच्चू कडूंचा सवाल

सत्तेत असताना पवारांनी का नाही सोडविले शेतकऱ्यांचे प्रश्न - बच्चू कडूंचा सवाल

Next
ठळक मुद्देरात्रभर आंदोलनस्थळी बच्चू कडूंनी मांडले ठाण राज्य सरकावर केली बोचरी टीका


अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आता शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा मोठा पुळका येत आहे. याच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाचे कृषीमंत्रीपद भूषविले आहे, तसेच त्यांचा पक्ष राज्यातील सत्तेतही वाटेकरी होता. तेव्हा शरद पवार व इतर राष्ट्रवादी नेत्यांनी शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याची हिंमत का दाखविली नाही, आताच त्यांना शेतकºयांचा एवढा पुळका कशासाठी येत आहे, अशी बोचरी टीका प्रहार चे नेते आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी येथे केला.
येथील पोलिस मुख्यालय परिसरात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या शेतकºयांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी शेतकºयांना संबोधित करताना चौफेर टीका केली. आजवरच्या कोणत्याही सरकारने शेतकºयांच्या समस्या निकाली काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. अस्मानी व सुल्तानी संकटांनी शेतकरी नेहमीच्या नागविल्या गेला आहे. परंतु, सत्ताधाºयांना त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. संकटांनी पिचलेला शेतकरी आत्महत्या करीत असतानाही सरकार शांत आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता स्वत: शेतकºयांनीच पुढे यायला हवे. या सरकारकडून कोणतीही अपेक्षा केली जाऊ शकत नाही. शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही किसान आर्मी काढत आहोत. यापुढे कोणत्याही शेतकºयाने हिंमत न हारता परिस्थितीचा सामना करायला हवा. कोणाच्याही मनात आत्महत्येचा विचार डोकावत असेल, तर त्या शेतकºयांने मला केवळ एक मिसकॉल द्यावा, त्यांच्या हक्कसाठी मी प्राणाची बाजी लावण्यासही तयार आहे.
यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात सुरु केलेल्या आंदोलनाचे कौतुक करताना हे आंदोलन शेतकºयाचे आहे. या आंदोलनात शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे आवाहनही यावेळी कडू यांनी केले.

Web Title: When Pawar was in power, the question of the farmers not being solved - Chachu Kadu's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.