प्रख्यात कवी विठ्ठल वाघांच्या स्वरात गुंजणार स्वच्छ भारत अभियानाची महती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 10:03 PM2017-12-31T22:03:31+5:302017-12-31T22:11:28+5:30

अकोला : वर्‍हाडी भाषेचा गोडवा अन् सहज सुलभ शब्दांनी मनाचा ठाव घेणारी रचना, हे विठ्ठल वाघांच्या कवितेचे वैशिष्ट्ये असल्याने ते संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य प्रांतात लोकप्रिय आहेत. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी अकोला महापालिकेने स्वच्छ शहर सर्वेक्षण २0१८ साठी त्यांना स्वच्छ भारत अभियानाचे दूत म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.

In the voice of renowned poet Vithal Wagh, the pride of Swachh Bharat Abhiyan | प्रख्यात कवी विठ्ठल वाघांच्या स्वरात गुंजणार स्वच्छ भारत अभियानाची महती

प्रख्यात कवी विठ्ठल वाघांच्या स्वरात गुंजणार स्वच्छ भारत अभियानाची महती

Next
ठळक मुद्देमहापालिकेने केली दूत म्हणून नियुक्ती स्वच्छ  शहर सर्वेक्षण २0१८ साठी जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला- प्रख्यात कवी विठ्ठल वाघ यांचा पहाडी आवाज सर्वांनाच परिचित आहे. वर्‍हाडी भाषेचा गोडवा अन् सहज सुलभ शब्दांनी मनाचा ठाव घेणारी रचना, हे विठ्ठल वाघांच्या कवितेचे वैशिष्ट्ये असल्याने ते संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य प्रांतात लोकप्रिय आहेत. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी अकोला महापालिकेने स्वच्छ शहर सर्वेक्षण २0१८ साठी त्यांना स्वच्छ भारत अभियानाचे दूत म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २0१८ नुसार नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती करणे, कचर्‍याचे वर्गीकरण करून तो घंटा गाडीमध्येच टाकणे आदी बाबत महापलिका नागरिकांमध्ये जागृती करीत आहे. या जनजागृतीसाठी विठ्ठल वाघ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. त्यासाठी त्यांची या अभियानाचे दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, नागरिकांनी या अभियानासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले आहे.  

Web Title: In the voice of renowned poet Vithal Wagh, the pride of Swachh Bharat Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.