वनउपज तपासणी नाके गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:13 AM2017-10-06T02:13:33+5:302017-10-06T02:15:06+5:30

अकोला : प्रादेशिक वन विभागाच्या जंगलातून झाडांची अवैध  कत्तल करणे आणि या लाकडांची छुप्या मार्गाने वाहतूक  करणार्‍यांची तपासणी करण्यासाठी वन विभागाचे वनउपज त पासणी नाके शहरासह काही ठिकाणी अस्तित्वात होते; मात्र सद्य  स्थितीत हे चेक नाके गायब असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या  स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे.

Vanusa checkup missing! | वनउपज तपासणी नाके गायब!

वनउपज तपासणी नाके गायब!

Next
ठळक मुद्देवाशिम बायपाससह अनेक ठिकाणी होते ‘चेक नाके’ स्टिंग ऑपरेशन

सचिन राऊत । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रादेशिक वन विभागाच्या जंगलातून झाडांची अवैध  कत्तल करणे आणि या लाकडांची छुप्या मार्गाने वाहतूक  करणार्‍यांची तपासणी करण्यासाठी वन विभागाचे वनउपज त पासणी नाके शहरासह काही ठिकाणी अस्तित्वात होते; मात्र सद्य  स्थितीत हे चेक नाके गायब असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या  स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे.
 राष्ट्रीय महामार्ग व शहरात येणार्‍या मार्गाने लाकडांची अवैधरी त्या वाहतूक करण्याचे प्रमाण वाढल्यानंतर अवैध वृक्षतोड  आणि बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी वन विभागाद्वारे शहराच्या  चारही बाजूने येणार्‍या मुख्य मार्गावर तसेच जंगलातील काही  महत्त्वाच्या ठिकाणांवर वनउपज तपासणी नाके कार्यान्वित  करण्यात आले होते. शहरातील वाशिम बायपास, खडकीकडून  येणार्‍या मार्गावर वाहनांची तपासणी करणे तसेच लाकडांची  वाहतूक करणार्‍या वाहनांना एका वन विभागाकडून राबविण्यात  येत असलेल्या एका तपासणीच्या प्रक्रियेतून जावे जागत होते;  मात्र गत पाच वर्षांपासून वन विभागाचे हे चेक नाके गायब झाले  आहेत. यासंदर्भात वन विभागाच्या अधिकार्‍यांना विचारणा  केली असता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग गावाच्या बाहेरून गेल्यामुळे  हे तपासणी नाके त्यावेळी गावाबाहेर हलविल्याचे सांगितले;  मात्र शहराच्या बाहेरून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वन  विभागाचा एकही चेक नाका नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने  केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. वन विभागाचे  वनउपज तपासणी नाके गत अनेक वर्षांपासून कार्यान्वित  नसल्याने लाकडांची अवैधरीत्या होणारी वाहतूक मोठय़ा  प्रमाणात वाढल्याची माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत  समोर आली आहे. काटेपूर्णा अभयारण्य, पातुराला लागून  असलेले जंगल तसेच अकोट तालुक्यातील मेळघाट परिसरा तील जंगलातून अवैध वृक्ष कत्तल आणि वाहतूक करण्यात येत  असेल, तर त्याची तपासणीच होत नसल्याचीही माहिती समोर  आली आहे. अकोट तालुक्यातील खटकाली परिसरात एक  वनउपज चेक नाका आहे; मात्र हा नाका वगळता शहरातील  नाके अचानकच गायब झाल्याचे वन तस्करांचे चांगलेच फावले  आहे.

खटकालीमध्ये तपासणी
मेळघाट जंगलातून येणार्‍या खटकाली येथील वनउपज त पासण्यासाठी तत्पर असा चेक नाका आहे. या चेक नाक्यावर  वाहनांची तपासणी करण्यात येते; मात्र काटेपूर्णा व पातूरच्या  जंगलातून येणार्‍या वाहनांची तपासणी होत नसल्याची माहिती  ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.

पाच वर्षांपासून नाके नाहीत!
पातूर रोडवर असलेला मुख्य चेक नाका गत पाच वर्षांपासून  गायब आहे, हा नाका पातूर येथे हलविल्याचे सांगण्यात येते  तसेच राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेर गेल्याने हा नाका राष्ट्रीय  महामार्गावर असल्याचे सांगण्यात आले; मात्र सदर ठिकाणी हा  चेक नाकाच उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

Web Title: Vanusa checkup missing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.