भूमिगत गटार योजना; सांडपाण्याचे शुद्धीकरण करून पिकांना वापरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:36 PM2019-05-03T12:36:58+5:302019-05-03T12:37:42+5:30

अकोला: महापालिका प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भूमिगत गटार योजनेतील सात एमएलडीच्या सीवरेज ट्रीटमेन्ट प्लांट (मलनिस्सारण प्रक्रिया)च्या बांधकामाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात सुरुवात करण्यात आली आहे.

Underground sewer scheme; Cleanse the sewage and use it for the crops! | भूमिगत गटार योजना; सांडपाण्याचे शुद्धीकरण करून पिकांना वापरणार!

भूमिगत गटार योजना; सांडपाण्याचे शुद्धीकरण करून पिकांना वापरणार!

googlenewsNext

- आशिष गावंडे
अकोला: महापालिका प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भूमिगत गटार योजनेतील सात एमएलडीच्या सीवरेज ट्रीटमेन्ट प्लांट (मलनिस्सारण प्रक्रिया)च्या बांधकामाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात सुरुवात करण्यात आली आहे. शिलोडा येथील ३० एमएलडी प्लांटच्या बांधकामात प्रचंड अनियमितता व तक्रारी झाल्यानंतर निदान या प्लांटच्या बांधकामाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पीडीकेव्ही परिसरातील प्रकल्पाचे पाणी शुद्ध करून येथील पिकांना देण्यात येईल.
‘अमृत’ योजनेंतर्गत शहरातील घाण सांडपाण्यावर पुर्नप्रक्रिया करून त्याचा वापर शेती किंवा उद्योगासाठी करता येईल, अशा दुहेरी भूमिगत गटार योजनेच्या कामाला जानेवारी २०१८ मध्ये सुरुवात झाली. भूमिगत गटार योजनेंतर्गत शासनाने ३० आणि सात एमएलडीचे दोन प्लांट उभारण्यासाठी ७९ कोटी २३ लाख रुपये मंजूर केले. मनपा प्रशासनाने ६१ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रकाशित केली असता ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनी ठाणे यांच्यावतीने ८.९१ टक्के जादा दराची निविदा प्राप्त झाली होती. योजनेतील महत्त्वाचा घटक असलेल्या ‘एसटीपी’ जागेसाठी शिलोडा परिसरातील सहा एकर व पीडीकेव्ही परिसरातील जागा मनपाने निश्चित केली. शिलोडा येथील एसटीपीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, आता पीडीकेव्ही परिसरात सात एमएलडी प्लांटच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

३० ‘एमएलडी’चा प्लांट अंतिम टप्प्यात
शिलोडा परिसरातील ३० एमएलडीच्या सीवरेज ट्रीटमेंट प्लांटचे काम ८० टक्के झाले आहे. या ठिकाणी घाण सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन शेतीसाठी वापरायोग्य पाण्याचा वापर केला जाईल. विद्युत व्यवस्थेसाठी सबस्टेशनच्या माध्यमातून विद्युत वाहिनीचे जाळे टाकण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

‘पीडीकेव्ही’सोबत करार
पीडीकेव्ही परिसरात उभारल्या जाणाºया सात एमएलडी प्लांटवरील पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर शुद्ध होणाºया पाण्याचा या परिसरातील शेतीसाठी वापर केला जाणार आहे. जागेच्या बदल्यात पाणी, असा करार महापालिका प्रशासनाने पीडीकेव्ही प्रशासनासोबत केला आहे.


‘एसटीपी’वर ६१ कोटींचा खर्च
भूमिगत योजनेंतर्गत ३० एमएलडीचा प्लांट शिलोडा परिसरात आणि दुसरा सात एमएलडीचा प्लांट पीडीकेव्ही परिसरात उभारला जात आहे. मोर्णा नदीच्या काठावर एका बाजूने १ हजार व्यास व दुसऱ्या बाजूला ६०० व्यासाची पाइपलाइन बसविण्याचे काम सुरू आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरात १४ किलोमीटर अंतराच्या जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. योजनेच्या एकू ण कामापैकी ६१ कोटींचा खर्च उपरोक्त कामांवर केला जाणार आहे.

पीडीकेव्ही परिसरातील एसटीपीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांत प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. कामाच्या गुणवत्तेवर लक्ष आहे.
-सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग मनपा.

 

Web Title: Underground sewer scheme; Cleanse the sewage and use it for the crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.