दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 18:38 IST2018-11-02T18:37:35+5:302018-11-02T18:38:09+5:30

महान : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन वर्षीय चिमुकलीसह तिचे वडील गंभीर जखमी झाले.

two killed killed in an accident near mahan | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन ठार

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन ठार

महान : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन वर्षीय चिमुकलीसह तिचे वडील गंभीर जखमी झाले. ही घटना महानजवळील वस्तापूर गावाजवळ २ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. संदीप रामचंद्र बेले (३५) रा.मरडडोह ता.मालेगाव जि. वाशीम व सदानंद शामराव झाटे (४०) रा. खोपडी ता.बार्शीटाकळी अशी मृतकांची नावे आहेत.
खोपडी येथून नंबर नसलेल्या दुचाकीने संदीप बेले हे २ नोव्हेंबर रोजी सकाळी महानकडे येत होते. दरम्यान, महान जवळ असलेल्या वस्तापूर गावातील उतारावर समोरून येत असलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३0 झेड ४३९८ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. ही धडक एवढी भिषण होती की संदीप रामचंद्र बेले व सदानंद शामराव झाटे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.तसेच सिद्धार्थ सावळे व त्यांची दोन वर्षीय चिमुकली आराध्य सिद्धार्थ सावळे रा. खोपडी हे गंभीर जखमी झाले आहेत. दोन वर्षीय आराध्य सावळे ही गंभीर जखमी झाल्याने तिला अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंजर येथील संत गाडगे बाबा आपातकालीन पथकाचे दिपक सदाफळे व त्यांचे सहकारी भगवंता गोरे यांनी पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहीकेने उपचारार्थ अकोला येथे हलवले.संदीप रामचंद्र बेले हे मूळ मरडडोह येथील रहिवाशी असून ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मजूरीच्या कामाकरीता खोपडी येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होते.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंजर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. तसेच दोन्ही युवकांचे प्रेत शवविच्छिेदनासाठी अकोला येथे पाठवले. पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.

 

Web Title: two killed killed in an accident near mahan