रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी तिसरा ओव्हरब्रिज!

By admin | Published: July 7, 2017 01:41 AM2017-07-07T01:41:33+5:302017-07-07T01:41:33+5:30

लीफ्ट आणि वायफाय झोनचे कामही युद्धस्तरावर : खासदार धोत्रे यांनी जाणून घेतल्या समस्या

Third overbridge for railway station extension! | रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी तिसरा ओव्हरब्रिज!

रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी तिसरा ओव्हरब्रिज!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी लवकरच तिसरा ओव्हरब्रीज आणि सरकता जीना गड्डम प्लॉटकडून उभारला जाणार असून, येथे प्लॅट फार्म , रेल्वे तिकीट केंद्राची निर्मिती होणार आहे. अकोला रेल्वेस्थानक विकासाच्या या प्रकल्पांवर ३० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे, अशी माहिती अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी दिली. रेल्वे समस्यांबाबत आयोजित प्रवाशांच्या दरबारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
रेल्वेस्थानकावर येणाऱ्या समस्यांबाबत खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधवा असे निर्देश प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून आल्यामुळे गुरुवारी अकोला रेल्वे स्थानकावर भाजपच्यावतीने दरबार ठेवण्यात आला होता. अकोला रेल्वेस्थानक प्रबंधक जी.बी.मीणा यांच्या कक्षात बसून आधी खा.धोत्रे यांनी प्रवाशांच्या समस्या ऐकून घेतल्यात. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत रेल्वे प्लॅट फार्मवरील साफसफाईचा आढावा घेतला. त्यानंतर आरपीएफसमोरून दुसऱ्या दादऱ्यालगत होणाऱ्या लीफ्टआणि गड्म प्लॉटकडून उभारल्या जाणाऱ्या ओव्हरब्रीजच्या जागेची पाहणीही त्यांनी केली. रेल्वेस्थानक परिसरात वायफाय झोन आणि लीफ्टचे काम पंधरवड्यात होणार असून मालधक्क्यावरील समस्या सोडविण्यासाठीही आपण पुढाकार घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. तत्काळच्या आरक्षण तिकिटात होणारा एजंटचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे; पण काहींची दुकानदारी अजूनही सुरूच आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून काही बाबी सक्तीच्या कराव्या लागतील तसेच तिकीट केंद्रावर होणारा गैरवापर टाळण्यासाठी सीसी कॅमेरे येथे लावावेत असे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिल्याचे ते म्हणाले. अकोला रेल्वे स्थानकाकडे सामान स्कॅनिंग मशीन पडून आहे. तीदेखील कार्यरत करण्याकडे खासदारांचे लक्ष वेधले गेले. असा इशाराही खा.धोत्रे यांनी दिला. यावेळी खासदार धोत्रे यांच्यासमवेत आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय पनपालिया, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, वसंत बाछुका, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, उपमहापौर वैशाली शेळके, राहुल देशमुख, सुमन गावंडे, सारिका जैस्वाल, डॉ. विनोद बोर्डे, संजय जिरापुरे,धनंजय गिरीधर, हरीश अलीमचंदानी, अनूप गोसावी, गिरीश जोशी, विनोद मानवानी, गीतांजली शेगोकार, जयंत मसने, अनिल गरड, सतीश ढगे, संतोष पांडे, धनंजय धबाले, हिरा कृपलानी, राजेंद्र गिरी,अ‍ॅड.राजेश प्रधान, नाना कुलकर्णी, दीपक मायी, हरिभाऊ काळे, अनिल गरड, प्रवीण जगताप, विशाल इंगळे, अनिल मुरुमकर, अभियंता रायबोले, मल, ठाणेदार बढे, निकम, भुसावळचे अधिकारी अरुण कुमार, दक्षिण मध्य रेल्वे आणि सेंट्रल रेल्वेचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बोर्डाचे अधिकार स्वातंत्र्यपूर्व काळातील
रेल्वे विभाग स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याने रेल्वे बोर्डाला विशेष अधिकार देण्यात आले आहे. बोर्डाचे हे वर्चस्व अजूनही अबाधित आहे. मंत्रालयाच्या माध्यमातून आता त्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे इतर मंत्रालयाप्रमाणे या विभागात कामे होत नाहीत, असेही एका प्रश्नाच्या उत्तरादाखल खा.धोत्रे यांनी सांगितले.

Web Title: Third overbridge for railway station extension!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.