तहसीलदार विजय लोखंडे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 07:29 PM2021-04-17T19:29:46+5:302021-04-17T19:29:53+5:30

Tehsildar Vijay Lokhande remanded in police custody : न्यायालयाने आरोपीस १९ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Tehsildar Vijay Lokhande remanded in police custody for three days | तहसीलदार विजय लोखंडे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

तहसीलदार विजय लोखंडे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

googlenewsNext

अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदारास ५ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक निलेश कळसकर याच्यासह याप्रकरणात अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांचाही सहभाग असल्याने त्यांना अकोला एसीबीने शुक्रवारी सहआरोपी केल्यानंतर लोखंडे यांना अटक करून शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १९ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अकोला तहसील कार्यालयातील अन्न नागरी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेला निलेश भास्कर कळसकर (वय ३२) याने बोरगाव मंजू येथील स्वस्त धान्य दुकानदाराने त्यांच्या दुकानातून कोरोनाकाळात वाटप केलेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या अंदाजे ५५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यासाठी ५ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरवठा निरीक्षक निलेश कळसकार यास अटक केली होती. त्यानंतर कळसकर पोलीस कोठडीत असताना कसून चौकशी केली असता या प्रकरणात अकोला तहसीलदार विजय लोखंडे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे या लाचखोरी प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार लोखंडे यांना अटक केली. तहसीलदार लोखंडे यांचे नाव निलेश कळसकार याच्याकडून समोर आल्यानंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई करून तहसीलदार लोखंडे यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 

अमरावतीच्या पथकाकडून घराची झडती

अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांना शुक्रवारी रात्री अटक केल्यानंतर त्याचवेळी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख गजानन पडघन यांनी अकोल्यात धाव घेतली. त्यांनी तहसीलदार लोखंडे यांच्या घराची झडती घेतली. त्यानंतर विजय लोखंडे यांच्या संपत्तीची चौकशी सुरू केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनात घराची झडती सुरू आहे. शुक्रवार व शनिवारी अशा दोन दिवसांत अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विजय लोखंडे यांच्या घराची व संपत्तीची चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Tehsildar Vijay Lokhande remanded in police custody for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.