लॉकडाऊनला अकोलेकरांचा प्रतिसाद; पहिल्या दिवशी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 06:18 PM2021-05-10T18:18:58+5:302021-05-10T18:41:37+5:30

Lockdown in Akola : अकाेला शहरातील अनेक रस्ते आणि चौकात स्मशानशांतता होती.

Strict restrictions, strict enforcement, road deserted on the first day | लॉकडाऊनला अकोलेकरांचा प्रतिसाद; पहिल्या दिवशी शुकशुकाट

लॉकडाऊनला अकोलेकरांचा प्रतिसाद; पहिल्या दिवशी शुकशुकाट

googlenewsNext
ठळक मुद्देठिकठिकाणी झाली वाहनांची तपासणीनेहमी वर्दळीचे चौक अन् रस्ते राहिले निर्मनुष्य

अकाेला : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात सहा दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. याच कठोर निर्बंधांचा साेमवारी पहिला दिवस हाेता. निर्बंधांची कडक अंमलबजावणी झाल्यामुळे नेहमी नागरिकांची वर्दळ राहणारे चौक आणि रस्ते निर्मनुष्य होते. शिवाय, अकाेला शहरातील अनेक रस्ते आणि चौकात स्मशानशांतता होती. एकूणच पहिल्या दिवशी अकाेलेकरांनी कठोर निर्बंधांचे पालन केले.

जिल्ह्यात कोविडबाधितांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येने आराेग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला वेळीच ब्रेक न लावल्यास जिल्ह्यात कोविड विषाणू मृत्यूचे सत्र वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. कठोर निर्बंधांशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी रविवार रात्रीपासून सक्तीची संचारबंदी लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्यात. याच सूचनांची साेमवारी सकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. सक्तीच्या संचारबंदीच्या काळात प्रत्येक नागरिकाने घरात थांबून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने नेहमी वर्दळ राहणारे चौक आणि रस्ते आज निर्मनुष्य होते. तर ज्यांनी कठोर निर्बंध लागू होऊन बेशिस्तीचा परिचय दिला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Web Title: Strict restrictions, strict enforcement, road deserted on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.