राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा : मुलींमध्ये नाशिक, तर मुलांमध्ये औरंगाबाद संघाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:30 PM2017-12-11T22:30:40+5:302017-12-11T22:40:22+5:30

मूर्तिजापूरच्या  क्रीडांगणावर झालेल्या २५ व्या राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत मुलींमध्ये नाशिकने तर मुलांमध्ये औरंगाबादच्या संघाने विजेतेपद पकावले. या स्पर्धेत ३0 जिल्ह्यातील मुले आणि मुलींच्या ७00 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

State level throwball competition: Girls win Nashik, and boys win Aurangabad team | राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा : मुलींमध्ये नाशिक, तर मुलांमध्ये औरंगाबाद संघाला विजेतेपद

राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा : मुलींमध्ये नाशिक, तर मुलांमध्ये औरंगाबाद संघाला विजेतेपद

Next
ठळक मुद्देमुर्तिजापूर येथे आयोजित राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेचा समारोपस्पर्धेत ३0 जिल्ह्यातील ७00 खेळाडूंनी नोंदविला सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: तालुका क्रीडा संकुल मूर्तिजापूरच्या  क्रीडांगणावर झालेल्या २५ व्या राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत मुलींमध्ये नाशिकने तर मुलांमध्ये औरंगाबादच्या संघाने विजेतेपद पकावले. या स्पर्धेत ३0 जिल्ह्यातील मुले आणि मुलींच्या ७00 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. 

स्पर्धेत द्वितीय क्रमांक जळगाव तर तृतीय स्थान यवतमाळ संघाने प्राप्त केले. मुलींमध्ये नाशिकच्या  संघाने विजयश्री मिळविला. दुसर्‍या स्थानी नागपूर व तिसर्‍या स्थानी मुंबई उपनगर संघ राहिले. विजयश्री मिळविणार्‍या संघाला महाराष्ट्र थ्रो बॉल असोसिएशनचे अध्यक्ष कोंडलवार, सचिव किरण फुलझेले, कोषाध्यक्ष रंजनी मुरारका, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, प्राचार्य गजेंद्र काळे प्रा. गायकवाड, शहर काँग्रेस अध्यक्ष धीरज अग्रवाल, न.प. पाणीपुरवठा सभापती स्नेहा गजानन नाकट, समाजसेवक गजानन नाकट आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संचालन ज्ञानेश्‍वर खोत यांनी केले तर आभार सुभाष ठाकरे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक समितीचे संजय इसाळकर,  प्रा. संतोष ठाकरे, मुकुद पैकट, भाजपा तालुका अध्यक्ष नारायणराव भटकर, ज्ञानेश टाले, दिनेश निमोदिया, प्रेम शर्मा, संजय राजहंस, दिनेश श्रीवास आदींसह नागरिकांनी परिश्रम घेतले. 

Web Title: State level throwball competition: Girls win Nashik, and boys win Aurangabad team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.