‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:22 PM2018-12-09T13:22:33+5:302018-12-09T13:22:40+5:30

अकोला : जागतिक बँक अर्थसाहाय्यातून राज्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्री बिजनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन’ (स्मार्ट) प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. ‘

'Smart' project includes Akola district! | ‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट!

‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट!

Next

- संतोष येलकर
अकोला : जागतिक बँक अर्थसाहाय्यातून राज्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्री बिजनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन’ (स्मार्ट) प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत ५ डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीचा आयएनआय फार्मस् कंपनीसोबत केळी व डाळिंब निर्यातीचा करार करण्यात आला.
शेतकºयांच्या शेतमाला योग्य भाव मिळावा, यासाठी राज्यातील शेतमालाची निर्यात करण्याकरिता शासनामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून २१ कोटी रुपयांचा ‘स्मार्ट’ प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीचा मुंबईच्या आयएनआय फार्मस् कंपनीसोबत केळी व डाळिंब निर्यातीचा करार करण्यात आला. त्यावेळी अकोट येथील नरनाळा शेतकरी कंपनीचे संचालक पंजाबराव बोचे व आयएनआय कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्मार्ट प्रकल्पांतर्गत निर्यातीचा करार झाल्याने अकोटच्या नरनाळा शेतकरी कंपनीमार्फत केळी व डाळिंबाची निर्यात युरोप व आखाती देशात करण्यात येणार आहे. शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्ह्याचा समावेश झाल्याने जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे.

पायाभूत सुविधा उपलब्ध होणार!
शासनाच्या स्मार्ट प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला असून, या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतमाल निर्यातीसाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.


भेंडी, मिरची निर्यातीचा करारही लवकरच!
शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील मिरची, भेंडी व इतर भाजीपाला निर्यातीचा करारदेखील अकोल्याच्या मोर्णा व्हॅली कंपनीमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील केळी, डाळिंबासह मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांचीही निर्यात होणार आहे.
 

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पात अकोला जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नरनाळा शेतकरी कंपनीमार्फत केळी व डाळिंब निर्यातीचा करार मुंबईच्या आयएनआय कंपनीसोबत करण्यात करण्यात आला. स्मार्ट योजनेत जिल्हा समाविष्ट झाल्याने जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे.
-अशोक अमानकर,
उपजिल्हाधिकारी (रोहयो)

 

 

Web Title: 'Smart' project includes Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.