‘आरटीओ’ कार्यालयाचे होणार स्थानांतरण; आ. बाजोरियांचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:29 PM2018-10-06T13:29:02+5:302018-10-06T13:30:40+5:30

उपप्रादेशिक कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी शिवसेना आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी पुढाकार घेत शुक्रवारी शहरातील काही शासकीय कार्यालयांची पाहणी केली.

 'RTO' office will be transferred to the office | ‘आरटीओ’ कार्यालयाचे होणार स्थानांतरण; आ. बाजोरियांचा पुढाकार 

‘आरटीओ’ कार्यालयाचे होणार स्थानांतरण; आ. बाजोरियांचा पुढाकार 

googlenewsNext
ठळक मुद्देआरटीओ कार्यालयाचे तीन वर्षांपूर्वी स्थानांतरण होऊन रेल्वे स्टेशन चौकातील मनपाच्या शाळेत कार्यान्वित करण्यात आले होते. कोसळणारे छत व गळक्या छतामुळे पावसात भिजणारे दस्तऐवज आदी समस्यांचा सामना करताना वरिष्ठ अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. अखेर जीर्ण इमारतीचा धोका लक्षात घेता आरटीओ कार्यालय स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अकोला: उपप्रादेशिक कार्यालयाची (आरटीओ) इमारत जीर्ण झाल्यामुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता या कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी शिवसेना आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी पुढाकार घेत शुक्रवारी शहरातील काही शासकीय कार्यालयांची पाहणी केली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार व इतर अधिकारी उपस्थित होते.
अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गालगतच्या आरटीओ कार्यालयाचे तीन वर्षांपूर्वी स्थानांतरण होऊन रेल्वे स्टेशन चौकातील मनपाच्या शाळेत कार्यान्वित करण्यात आले होते. या इमारतीचे भाडे महापालिका प्रशासनाकडे जमा केले जाते. दरम्यान, इमारतीची रचना पाहता या ठिकाणी कामकाज करणे अधिकारी-कर्मचाºयांसाठी अवघड झाले आहे. वाहने ठेवण्यासाठी तोकडी जागा, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छतागृहाचा अभाव, जीर्ण झालेली इमारत, ठिकठिकाणी कोसळणारे छत व गळक्या छतामुळे पावसात भिजणारे दस्तऐवज आदी समस्यांचा सामना करताना वरिष्ठ अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होऊन परवाना मिळविण्यासाठी येणाºया नागरिकांचीही कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात मागील वर्षभरापूर्वी आ.गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. संबंधित अधिकाºयांनीसुद्धा ही समस्या सोडविण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने आ.बाजोरियांनी सदर कार्यालयाची दोन वेळा पाहणी केली. अखेर जीर्ण इमारतीचा धोका लक्षात घेता आरटीओ कार्यालय स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आ.बाजोरिया यांनी शुक्रवारी आरटीओ कार्यालयाची पाहणी करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांच्यासोबत चर्चा केली, तसेच शहरातील इतर कार्यालयांची पाहणी केली. यावेळी शहर प्रमुख तथा मनपा गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

‘बीएसएनएल’ कार्यालयाची पाहणी
‘आरटीओ’ कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी आ.बाजोरिया यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, राजेश मिश्रा, गजानन चव्हाण यांच्यासह इतर अधिकाºयांनी याच परिसरातील ‘बीएसएनएल’ कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर शहरातील इतरही जागेची पाहणी क रण्यात आली.

स्लॅब कोसळला; दस्तऐवज वाºयावर
मनपा शाळेच्या इमारतीत आरटीओ कार्यालय थाटण्यात आले. ही इमारत जुनी असल्याने पावसाळ्यात ठिकठिकाणी स्लॅब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दस्तऐवज ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने एका खोलीत पोत्यांमध्ये भरून दस्तऐवज ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. जीर्ण झालेले दस्तऐवज रामभरोसे असल्याचे आढळून आले.

--फोटो--सीटीसीएल झाला आहे,अवश्य घेणे---

 

Web Title:  'RTO' office will be transferred to the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.