जीएसटी परिषदेने केलेल्या बदलामुळे उद्योजकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:11 PM2018-07-27T13:11:16+5:302018-07-27T13:12:58+5:30

अकोला : गुड्स अ‍ॅन्ड सर्व्हिस टॅक्सच्या २८ व्या परिषदेत अनेक किरकोळ बदल झाल्याने देशभरातील सूक्ष्म आणि लघू उद्योजकांना दिलासा मिळाला आहे

Remedies to entrepreneurs due to change by GST Council | जीएसटी परिषदेने केलेल्या बदलामुळे उद्योजकांना दिलासा

जीएसटी परिषदेने केलेल्या बदलामुळे उद्योजकांना दिलासा

Next
ठळक मुद्देलघू उद्योग घटक- किरकोळ व्यापाºयाकरिता नवीन सुलभ रिटर्न फार्मची सुविधा जीएसटी परिषदेने केली आहे. जीएसटी परिषदेच्या या निर्णयाचे विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्सने स्वागत केले आहे.


अकोला : गुड्स अ‍ॅन्ड सर्व्हिस टॅक्सच्या २८ व्या परिषदेत अनेक किरकोळ बदल झाल्याने देशभरातील सूक्ष्म आणि लघू उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आगामी ४ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या जीएसटी परिषदेच्या २९ व्या बैठकीत लघू व्यावसायिकांसाठी विशेष सवलती जाहीर होण्याची शक्यता विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना आहे.
पाच कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणाºया लहान व्यापाºयाला त्रैमासिक रिटर्न भरण्याची सुविधा देणे, कंपोझिशन डीलरसाठी वार्षिक उलाढाल सीमा वाढवून १.५ कोटी करणे, आरसीएम ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत निलंबित ठेवणे, सोबतच सॅनिटरी नॅपकीन, हस्तनिर्मित शिल्प, हातकला, बांबू चटई, कमी किमतीची पादत्राणे, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदींवर जीएसटी दरात सवलत देणे, लघू उद्योग घटक- किरकोळ व्यापाºयाकरिता नवीन सुलभ रिटर्न फार्मची सुविधा जीएसटी परिषदेने केली आहे. जीएसटी परिषदेच्या या निर्णयाचे विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्सने स्वागत केले आहे. सोबतच आता ४ आॅगस्टच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परिषद सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा विदर्भ चेंबर्स आॅफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष राजकुमार बिलाला, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया, चेंबर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन खंडेलवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष निकेश गुप्ता, सचिव विवेक डालमिया, राहुल गोयनका, किशोर बाछुका यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: Remedies to entrepreneurs due to change by GST Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.