दोन जुगार अड्डय़ांवर छापा; ११ जण गजाआड

By admin | Published: October 7, 2014 01:47 AM2014-10-07T01:47:42+5:302014-10-07T01:47:42+5:30

अकोल्यातील कोठारी वाटिकेतील कारवाई.

Raid on two gambling locations; 11 people out of bounds | दोन जुगार अड्डय़ांवर छापा; ११ जण गजाआड

दोन जुगार अड्डय़ांवर छापा; ११ जण गजाआड

Next

अकोला : अँन्टी गुंडा स्क्वॉडने सोमवारी सायंकाळी कोठारी वाटिकेतील चक्रपाणी कॉम्प्लेक्समध्ये आणि आकोट फैलातील साधना चौकात छापा घालून जुगार खेळणार्‍या ११ जणांना अटक केली. कोठारी वाटिका परिसरात जुगार खेळणारे अशोक नानाराव कोठीकर, सुरेश जंगलू तिजारे, प्रसेनजित नारायण जोंधळे, पंकज नित्यानंद डोंगरे, अनिल शिवलिंग गोपनारायण आणि आकोट फैलातील साधना चौकातील राजकुमार साहू याच्या घरात जुगार खेळताना अनिल विजय तायडे, सुनील उमाकांत गुंडेकर, मनीष बलराज जिडे, मनोज रामदास कनकर, दिनेश रामराव सोळंके, आनंद बालाराम बिचकुंदे यांना अटक केली. आरोपींकडून रोख २६ हजार ९00 रुपये, ९ मोबाईल, असा एकूण ५0 हजार ४३0 रुपयांचा ऐवज जप्त केला.

Web Title: Raid on two gambling locations; 11 people out of bounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.