शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवडीची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:08 PM2018-06-08T14:08:53+5:302018-06-08T14:08:53+5:30

Preparation of the plantation of farmers on the construction of trees! | शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवडीची तयारी!

शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवडीची तयारी!

googlenewsNext
ठळक मुद्देअकोला ८५ हजार; बुलडाणा जिल्ह्यात ५० हजार वृक्ष लागवडीचे नियोजन.वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड करण्याचा निर्णय गत १२ एप्रिल रोजी शासनामार्फत घेण्यात आला आहे.


अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेताच्या बांधावर व शेतकºयांच्या जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत अकोला व बुलडाणा जिल्ह्यात शेतकºयांच्या बांधावर वृक्ष लागवडीची तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात ८५ हजार तर बुलडाणा जिल्ह्यात ५० हजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकºयांच्या बांधावर व शेतकºयांच्या शेतजमिनीवर वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड करण्याचा निर्णय गत १२ एप्रिल रोजी शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात शेतकºयांच्या शेताच्या बांधावर व जमिनीवर वृक्ष लागवड करण्याचे नियोजन सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात शेतकºयांच्या बांधावर ८५ हजार तर बुलडाणा जिल्ह्यात शेतकºयांच्या बांधावर ५० हजार वृक्ष लागवड करण्याची तयारी सामाजिक वनीकरण विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

शेतकºयांच्या बांधावर ‘या’ वृक्षांची केली जाणार लागवड!
शेतकºयांच्या बांधावर व शेतकºयांच्या शेतजमिनीवर वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत राज्यात संबंधित लाभार्थी शेतकºयांकडून शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये साग, खाया, निम, चारोळी, महोगनी, आवळा, हिरडा, बेहडा, अर्जुन, सीताफळ, चिंच, जांभूळ, बाभूळ, अंजन, बिबा, खैर, आंबा, काजू, फणस, ताड, शिंदी, शिवण, शेवगा, हादगा, कडीपत्ता, महारुख, मॅजियम, मेलीया-डुबिया इत्यादी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दोन जिल्ह्यांत ७३ हजार वृक्ष लागवडीचे अर्ज प्राप्त!
शेतकºयांच्या शेताच्या बांधावर वृक्ष लागवडीसाठी वृक्ष लागवड करणाºया शेतकºयांचे अर्ज संबंधित ग्रामपंचायतींकडून मागविण्यात आले आहेत. त्यामध्ये ६ जूनपर्यंत अकोला जिल्ह्यात ६५ हजार वृक्ष लागवडीसाठी तर बुलडाणा जिल्ह्यात आठ हजार वृक्ष लागवडीसाठी शेतकºयांचे अर्ज ग्रामपंचायतींमार्फत सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाले.

शेतकºयांच्या बांधावर वृक्ष लागवड कार्यक्रमात अकोला जिल्ह्यात ८५ हजार व बुलडाणा जिल्ह्यात ५० हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या तयारीत अकोला जिल्ह्यात ६५ हजार तर बुलडाणा जिल्ह्यात आठ हजार वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायतींमार्फत शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले. अर्जांच्या छाननीनंतर शेतकºयांच्या बांधावर वृक्ष लागवडीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
-विजय मानकर, विभागीय वन अधिकारी,
सामाजिक वनीकरण, अकोला.

 

Web Title: Preparation of the plantation of farmers on the construction of trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.