पोलिसांनी जप्त केलेली २७ लाखांची रोकड आयकर खात्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 01:53 AM2017-12-07T01:53:09+5:302017-12-07T01:54:30+5:30

टिळक रोडवरील अलंकार मार्केटमधील एका व्यापार्‍याकडून पोलिसांनी जप्त केलेली २७ लाख ४६ हजार ४३0 रुपयांची रोख रक्कम आयकर खात्याकडे जमा केल्याची माहिती आहे. ही रक्कम पलकभाई रमनभाई पटेल यांची असून, ती हवाल्याची असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

Police seized Rs 27 lakhs of cash in the income tax department | पोलिसांनी जप्त केलेली २७ लाखांची रोकड आयकर खात्याकडे

पोलिसांनी जप्त केलेली २७ लाखांची रोकड आयकर खात्याकडे

Next
ठळक मुद्देअलंकार मार्केटमधील एका व्यापार्‍याकडून पोलिसांनी जप्त केली होती रक्कमही रक्कम पलकभाई रमनभाई पटेल यांची असून, ती हवाल्याची असल्याचे निश्‍चित

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : टिळक रोडवरील अलंकार मार्केटमधील एका व्यापार्‍याकडून पोलिसांनी जप्त केलेली २७ लाख ४६ हजार ४३0 रुपयांची रोख रक्कम आयकर खात्याकडे जमा केल्याची माहिती आहे. ही रक्कम पलकभाई रमनभाई पटेल यांची असून, ती हवाल्याची असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.
रणपिसे नगरातील रहिवासी पलकभाई रमनभाई पटेल यांच्याकडे २७ लाख ४६ हजार ४३0 रुपयांची रोख रक्कम असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. या शिवाय ज्यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली, त्यांनी ही रक्कम आपल्या व्यवसायाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पोलिसांनी कागदपत्रे मागितले असता त्यांच्याकडे काही कागदपत्रे आढळून आली; मात्र त्या कागदपत्रांमध्ये तफावत आढल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पलकभाई रमनभाई पटेल (२६) राहणार रणपिसे नगर यांना ताब्यात घेतले असून, एक दुचाकी असा एकूण २७ लाख ४६ हजार ४३0 रुपयांच्या रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे. ही रोकड आयकर खात्याकडे जमा करण्यात आल्याची माहिती आहे.
-
 

Web Title: Police seized Rs 27 lakhs of cash in the income tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.