वाहनांवर दगडफेक; घंटागाड्यांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:49 AM2017-07-29T02:49:41+5:302017-07-29T02:52:48+5:30

नायगाव येथील संतप्त नागरिकांनी शुक्रवारी घनकचरा टाकण्यासाठी आलेल्या घंटागाड्यांवर दगडफेक केली.

people pelted stones at garbage vehicles; property damage | वाहनांवर दगडफेक; घंटागाड्यांची तोडफोड

वाहनांवर दगडफेक; घंटागाड्यांची तोडफोड

Next
ठळक मुद्देडंम्पिंग ग्राउंड परिसरातील घटनावाहनचालक जखमी ; पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील घनकच-याच्या त्रासाने कंटाळलेल्या नायगाव येथील संतप्त नागरिकांनी शुक्रवारी घनकचरा टाकण्यासाठी आलेल्या घंटागाड्यांवर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहन चालक सूरज गवई जखमी झाले आहेत. याप्रकरणी मनपा प्रशासनाच्यावतीने अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
नायगाव परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या १० एकर जागेवर शहरातील कचºयाची साठवणूक केली जाते. पंरतु मागील काही वर्षांपासून या भागातील रहिवाशांच्या संख्येत वाढ झाली असून,अतिक्रमकांनी डंम्पिंग ग्राउंडच्या जागेवर कब्जा केल्याचे मनपाच्या लक्षात आले आहे. येथे कचरा टाकण्यासाठी जाणाºया घंटा गाडी चालकांना विविध अडथळ््यांचा सामना करावा लागत असल्याची घंटा गाडी चालकांची तक्रार आहे.
दरम्यान, साठवणूक केल्या जाणाºया कचºयावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे या ठिकाणी कचºयाचे ढीग तयार झाले असून,कचºयाची साठवणूक त्वरित बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी लावून धरली आहे. पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमध्ये रोष होता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे घंटागाडी चालक वाहने घेऊन डंम्पिंग ग्राउंडवर गेले असता स्थानिक नागरिकांनी चालकांना कचरा टाकण्यास मनाई केली. काही समजण्याच्या आत जमावाने मनपाच्या वाहनांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत वाहन चालक सूरज गवई जखमी झाले आहेत.

Web Title: people pelted stones at garbage vehicles; property damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.