वजन मापात तफावत दर्शविणाऱ्या 'वे ब्रीज' संचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:55 PM2018-12-08T12:55:06+5:302018-12-08T12:55:29+5:30

अकोला : स्थानिक एमआयडीसीत हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन ‘वे ब्रिज’च्या वजन मोजणीत तफावत असल्याची तक्रार अकोला डिस्ट्रीक्ट ट्रक ओनर्स वेलफेअर असोसिएशनने नोंदविल्यानंतर अकोला वैद्यमापनशास्त्र विभागाने अग्रवाल वे ब्रीजच्या संचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.

 Penalty action against the director of 'Weight Bridges' | वजन मापात तफावत दर्शविणाऱ्या 'वे ब्रीज' संचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई

वजन मापात तफावत दर्शविणाऱ्या 'वे ब्रीज' संचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई

Next

अकोला : स्थानिक एमआयडीसीत हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन ‘वे ब्रिज’च्या वजन मोजणीत तफावत असल्याची तक्रार अकोला डिस्ट्रीक्ट ट्रक ओनर्स वेलफेअर असोसिएशनने नोंदविल्यानंतर अकोला वैद्यमापनशास्त्र विभागाने अग्रवाल वे ब्रीजच्या संचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. सोबतच आठ दिवसांच्या आत वजनमापे पासिंग करून घेण्याची नोटीस बजावली. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ माजली आहे.
२७ नोव्हेंबर १८ रोजी एपी २१ व्ही ३९२९ हे वाहन वाशिमहून हरभरा भरून नीलेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अकोला येथे आले. वजन करण्यासाठी उद्योजकाने एका वे ब्रिजवर पाठविले. वाहनाच्या मालासह वजन २९७३० किलो मोजण्यात आले. वजन कमी असल्याचे दिसून आल्यावर हे वाहन लगेच समोर असलेल्या दुसºया वे ब्रिजवर पाठविण्यात आले. येथे वाहन मालासह वजन २९७८५ भरले. दोन्ही वजनात तफावत आढळल्याने पुन्हा दोन ठिकाणच्या वजनात बदल दिसून आले. एमआयडीसीतील दोन्ही वे-ब्रीजसंदर्भात अकोला डिस्ट्रीक ट्रक ओनर्स वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी सुभाष भट्टल आणि अब्दुल वसीम यांनी, सुधीर कॉलनीतील सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र कार्यालयाकडे तक्रार केली. त्याची गंभीर दखल या विभागाने घेतली असून, एमआयडीसीतील दोन वे ब्रीजची तपासणी वैद्यमापनशास्त्र विभागाने केली. यामध्ये तफावत आढळल्याने अग्रवाल वे ब्रिजवर कारवाई करण्यात आली.

 

 

तक्रारीत नमूद दोन्ही वे ब्रीजच्या वजन मापात २० किलोची तफावत आढळली. सोबतच दर्शनी भागात अग्रवाल यांनी प्रमाणपत्र ठेवलेले नव्हते. त्यामुळे ३ ए अन्वये नोटीस आणि नियम २२ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत वजनमापे अधिकृत पासिंगची मुदत अग्रवाल यांना देण्यात आली आहे.
-ज्ञानदेव सिमरे, निरीक्षक, वैद्यमापन शास्त्र, अकोला.



-वे-ब्रीजचे मालक वजनमापात घोळ करीत नाही. ट्रकचालक आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी हे प्रयोग करून बदमाशी करतात. २० ते ४० किलो वजनाची तफावत ही ग्राह्य असते. वजनात काही बदल आढळत असतील तर लगेच तक्रार केली पाहिजे.
-कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, इंडस्ट्रीज असोसिएशन, अकोला.

 

Web Title:  Penalty action against the director of 'Weight Bridges'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.