डॉ.पंदेकृवि आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सावाचे जल्लोषात उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:42 PM2018-10-05T14:42:52+5:302018-10-05T14:44:01+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सावाचे आयोजन ५ ते ७ आॅक्टोबरपर्यंत येथे करण्यात आले आहे

Opening of Dr.PDKV Inter College Yuva Mahotsav | डॉ.पंदेकृवि आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सावाचे जल्लोषात उदघाटन

डॉ.पंदेकृवि आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सावाचे जल्लोषात उदघाटन

Next

अकोला : भारतीय संगीत जीवन जगण्याची कला शिकविते, जीवन प्रफ्फुलीत करणारे,दिशा देणारे हे संगीत आहे. पंरतु पाश्चात संगीताचे आक्रमण वाढले आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती,संगीत जतन करण्याची खरी गरज असल्याचे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सावाचे आयोजन ५ ते ७ आॅक्टोबरपर्यंत येथे करण्यात आले आहे. डॉ. के.आर.ठाकरे सभागगृहात आयोजित या महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. भाले बोलत होते. व्यासपीठावर निम्न कृषी संचालनालयाचे संचालक डॉ. डी. बी. उंदीरवाडे, वनशास्त्र महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, कृषी महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. ए.एन. पसलावार,विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.आर.जी.देशमुख,डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, मोहन तोटावार यांची उपस्थिती होती.
डॉ. भाले म्हणाले, भारत हा तरू णांचा देश आहे. त्यादृष्टीने सर्व जग आपल्याकडे बघत आहे. आपणही जग जिंकण्याची म्हणजेच महासत्ता बनण्याची तयार ठेवली पाहिजे. ही ताकद भारतीय संस्कृतीत,आहे.युवा,विद्यार्थ्यांमध्ये आहे. आपले संगीत जिवन जगण्याची कला शिकवीते हे संगीत जोपासण्याची गरज आहे. युवा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासह आपल्या संगीताची जपणूक करण्यासाठी असावा.
यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापनेचा सुवर्ण महोत्सव असून, त्यानिमित्त २० ते २२ आॅक्टोबरपर्यंत कृषी विद्यापीठात शिवारफेरीसह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.या सुवर्ण महोत्सवी वर्षात होणाऱ्या युवा महोत्सवालाही महत्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ््या कला सादर करीत राष्टÑीय पातळीवर कृषी विद्यापीठाचा नावलौकीक वाढवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाचा कुलगुरू ंनी विद्यार्थ्यांनी शेती विकासासह,संशोधनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. २०१८ ते १९ हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, हा विचार समोर ठेवून आपण काम केले पाहिजे,शेतकºयांना शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे याच अनुषंगाने यावर्षी एक हजार विद्यार्थी गावोगाव जावून शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहे. शिवारफेरीत शेतकºयांना मार्गदर्शन करतील, २२ मार्च रोजी यासंदर्भात विद्यार्थी याकामी शेतकऱ्यांना मदत करतील. कार्यक्रमाचे प्रास्तावि तोटावर यांनी संचालन डॉ.आर.आर. शेळके तर आभार प्रदर्शन डॉ. एस.पी.लांबे यांनी केले.
विद्यापीठातील शासकीय, संलग्नित खाजगी एकूण ३८ महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी या महोत्सवात सहभागी झाले असून नृत्य, गायन, नाटक, मिमिक्री, वादन, वादविवाद, पोस्टर मेकिंग, पेंटिंग, माईम, कोलाज मेकिंग, क्ले मोडेलिंग, क्विझ, रांगोळी, कार्टून मेकिंग, स्कीट, इलोकेशन, एकपात्री प्रयोग, आदी प्रकारात आपले नैपुण्य प्रदर्शित करणार आहेत. सलग ३ दिवस चालणाºया या युवा महोत्सवाचे थाटात उदघाटन झाले. विद्यापीठातील सर्व संचालक, महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, प्राध्यापक वृंद यांचे सह विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार होते.
उदघाटन समारंभाप्रंसगी शलाखा महाले या विद्यार्थिंनीने पिया घर आया तर मयुरी भगत हिने लावणी नृत्य सादर करू न मंत्रमुग्ध केले.

 

Web Title: Opening of Dr.PDKV Inter College Yuva Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.