पोलिसांच्या छाप्यात केवळ १२९ रुपयांचा तंबाखू जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:52 PM2018-06-04T14:52:26+5:302018-06-04T14:52:26+5:30

रविवारी दुपारी शाळेजवळ तंबाखू विक्री करणाऱ्या ठेल्यावर कोतवाली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात जप्त काय केले, तर केवळ १२९ रुपयांचा तंबाखू व सिगारेटची पाकिटे.

Only 129 ruppes tobacco seized in police raid | पोलिसांच्या छाप्यात केवळ १२९ रुपयांचा तंबाखू जप्त!

पोलिसांच्या छाप्यात केवळ १२९ रुपयांचा तंबाखू जप्त!

Next
ठळक मुद्देतंबाखूविरोधी सप्ताह सुरू असल्याने पोलीस अधिकाºयांनी गुटखा, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास पोलीस कर्मचाºयांना बजावले आहे. मनीष गणेश वर्मा (३५ रा. न्यू राधाकिसन प्लॉट) याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात तंबाखूची पाकिटे आणि नऊ सिगारेटची पाकिटे असा एकूण १२९ रुपयांचा माल जप्त केला . ही कारवाई पीएसआय धनंजय रत्नपारखी, विपुल सोळंके, यशोधन जंजाळ यांनी केली.

अकोला: शहरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू, गुटख्याची विक्री होते आणि परप्रांतातूनसुद्धा ट्रकमध्ये भरून गुटखा येतो. हे जगजाहीर असतानादेखील अन्न, औषधे प्रशासन ढिम्म आहे. सध्या तंबाखूविरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहादरम्यान रविवारी दुपारी शाळेजवळ तंबाखू विक्री करणाऱ्या ठेल्यावर कोतवाली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात जप्त काय केले, तर केवळ १२९ रुपयांचा तंबाखू व सिगारेटची पाकिटे.
अकोला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, तंबाखू येतो; परंतु अन्न औषधे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडूनही मोठी कारवाई अपेक्षित असताना, तीसुद्धा होत आहे. सध्या तंबाखूविरोधी सप्ताह सुरू असल्याने पोलीस अधिकाºयांनी गुटखा, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास पोलीस कर्मचाºयांना बजावले आहे. त्यामुळे रविवारी दुपारी कोतवाली पोलिसांनी गांधी रोडवरील डीएव्ही कॉन्व्हेंटसमोर तंबाखू विक्री करणाºया मनीष गणेश वर्मा (३५ रा. न्यू राधाकिसन प्लॉट) याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात तंबाखूची पाकिटे आणि नऊ सिगारेटची पाकिटे असा एकूण १२९ रुपयांचा माल जप्त केला आणि तंबाखू प्रतिबंध कायदा कलम ६ ब (२४) १ नुसार गुन्हा दाखल करून मनीष वर्मा याला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका केली. ही कारवाई पीएसआय धनंजय रत्नपारखी, विपुल सोळंके, यशोधन जंजाळ यांनी केली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Only 129 ruppes tobacco seized in police raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.