पुनर्गठनच नाही; थकबाकदीरांना पीक कर्ज मिळणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:51 PM2019-06-02T12:51:15+5:302019-06-02T12:51:22+5:30

दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर असल्या तरी, पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

No restructuring; How to get crop loan ? | पुनर्गठनच नाही; थकबाकदीरांना पीक कर्ज मिळणार कसे?

पुनर्गठनच नाही; थकबाकदीरांना पीक कर्ज मिळणार कसे?

googlenewsNext

- संतोष येलकर
अकोला: राज्यातील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळणार कसे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर असल्या तरी, पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
२०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत अद्याप करण्यात आले नाही. दोन वर्षांपूर्वीचे पीक कर्ज थकीत असलेल्या थकबाकीदार शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामात बँकांकडून पीक कर्ज मिळणे शक्य नाही. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. थकीत पीक कर्ज रकमेचा भरणा करण्यासाठी शेतकºयांकडे पैसा नाही. थकीत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, येत्या खरीप हंगामासाठी थकबाकीदार शेतकºयांना पीक कर्ज देण्यास बँका तयार नाहीत. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नाही आणि दुसरीकडे पुनर्गठन झाले नसल्याने, बँकांकडून पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी, बियाणे-खते खरेदीसह खरीप पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न थकबाकीदार शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

खरीप पेरणीची वेळ आली आहे; मात्र दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांकडे पैसा नाही. त्यामुळे सरकारने थकबाकीदार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना खरीप हंगामासाठी बँकांकडून तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे.
-किशोर तिवारी,
अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

Web Title: No restructuring; How to get crop loan ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.