गणितानुभव सहज सुंदर करण्यासाठी अकोल्यातील ‘प्रभात’मध्ये ‘मॅथ फेअर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 06:15 PM2017-12-22T18:15:16+5:302017-12-22T18:18:32+5:30

अकोला : जगद्विख्यात गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जंयती निमित्त शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कुल येथे ‘मॅथ फेअर’चे आयोजन करण्यात आले होते.

Math fare in 'Prabhat' in Akola, to make math easy! | गणितानुभव सहज सुंदर करण्यासाठी अकोल्यातील ‘प्रभात’मध्ये ‘मॅथ फेअर’!

गणितानुभव सहज सुंदर करण्यासाठी अकोल्यातील ‘प्रभात’मध्ये ‘मॅथ फेअर’!

Next
ठळक मुद्दे गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जंयती निमित्त अभिनव उपक्रम ‘मॅथ्स मॅथलेट मंथ' अंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्र्त सहभाग घेतला.

 

अकोला : जगद्विख्यात गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जंयती निमित्त शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कुल येथे ‘मॅथ फेअर’चे आयोजन करण्यात आले होते.
गणितातील क्लिष्टता दूर करुन गणितानुभव सहज आणि सुंदर व्हावा, या हेतूने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन सिने निमार्ता दिग्दर्शक विराग वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी भुषवले तर सचिव निरज आंवडेकर, व्यवस्थापक अभिजित जोशी, उपप्राचार्य वृषाली वाघमारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. मुंबईत स्थायीक असलेले विराग वानखडे हे मुळचे अमरावतीचे असून, त्यांच्या संगीत क्षेत्रातील उपक्रमांची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर ‘मॅथ फेअर’ अंतर्गत विविध स्टॉलला भेटी देऊन विद्यार्थ्यांद्वारे होत असलेल्या विविध उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रचेता मुकुंद हिने केले. प्रभात किड्स स्कूल येथे सुरु असलेल्या ‘मॅथ्स मॅथलेट मंथ' अंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्र्त सहभाग घेतला. उपप्राचार्य वृषाली वाघमारे, गणित विभाग प्रमुख अजय खुळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या मार्गदर्शनात अर्चना उस्केल, अमिशा वोरा, सचिन देशपांडे, मो. असिफ, निखिल अन्नदाते, प्रिया शर्मा, रुपाली गिठहे, अर्चना राठी, कोमल चौरसिया, योगेश शाहू, मोनाली वाट, शुभांगी व्यव्हारे, अश्विनी भोंडे, शारदा खुळे, शिला जोशी, सोनाली पांडे, सारिका बर्वे आणि किशोर काळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

 

Web Title: Math fare in 'Prabhat' in Akola, to make math easy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.