महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवारी पुण्यापर्यंतच धावणार

By Atul.jaiswal | Published: February 17, 2024 07:11 PM2024-02-17T19:11:19+5:302024-02-17T19:11:27+5:30

ही गाडी कोल्हापूर ते पुणे दरम्यान रद्द राहील.

Maharashtra Express will run till Pune only on Wednesday | महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवारी पुण्यापर्यंतच धावणार

महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवारी पुण्यापर्यंतच धावणार

अकोला : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे आणि मिरज विभागातील तारगाव, मसुर आणि सिरवडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करण्यात येणार असल्याने २१ व २२ फेब्रुवारी या कालावधीत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट , तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामध्ये अकोला मार्गे धावणारी गोंदीया-कोल्हापुर महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकापर्यंतच जाणार असल्याने कोल्हापुरला जाणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक २१ फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. ही गाडी पुणे ते कोल्हापूर दरम्यान रद्द राहील. तर ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकांपासून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. ही गाडी कोल्हापूर ते पुणे दरम्यान रद्द राहील.

निजामुद्दीन -यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड मार्गे
१२६३० हजरत निजामुद्दीन -यशवंतपूर एक्स्प्रेस  प्रवास सुरु दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दौंड,पंढरपूर , मिरज मार्गे वळवली जाईल. 
१२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को दि गामा गोवा एक्स्प्रेस २२ फेब्रुवार रोजी दोन तास नियमन केले जाईल.

Web Title: Maharashtra Express will run till Pune only on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला