आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा :  पुणे विद्यापीठाने कोल्हापूर विद्यापीठावर वर्चस्व गाजविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 03:05 PM2018-12-02T15:05:56+5:302018-12-02T15:09:06+5:30

अकोला: चौथ्या फेरीअखेर अग्रमानांकित पुणे विद्यापीठाने ३-५, ०-५ गुणांनी कोल्हापूर विद्यापीठावर वर्चस्व गाजविले.

Inter University Chess Competition: University of Pune dominates Kolhapur University! | आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा :  पुणे विद्यापीठाने कोल्हापूर विद्यापीठावर वर्चस्व गाजविले!

आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा :  पुणे विद्यापीठाने कोल्हापूर विद्यापीठावर वर्चस्व गाजविले!

googlenewsNext

अकोला: चौथ्या फेरीअखेर अग्रमानांकित पुणे विद्यापीठाने ३-५, ०-५ गुणांनी कोल्हापूर विद्यापीठावर वर्चस्व गाजविले. पहिल्या पटावर ओंकार कायदरने वजिरांची चाल-प्रतिचाल करीत समान स्थिती राखली; मात्र मानांकित निखिल दीक्षितने डावाच्या अंतिम भागात तांत्रिक बुद्धिबळ खेळाचे अनुभवी प्रदर्शन करीत ओंकार कायदरचा पराभव केला. दुसऱ्या पटावर मुंबई विद्यापीठाने गुजरात विद्यापीठावर ३-१ गुणांनी विजय मिळविला.
महिला गटात पहिल्या पटावर शिवाजी विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाला बरोबरीत रोखण्यात यश मिळविले. पौर्णिमा उपळावीकर या कोल्हापूर विद्यापीठाच्या खेळाडूने मानांकित धनश्री पंडितला कडवी लढत दिली; मात्र धनश्रीने काळ्या राजाच्या बाजूला जोरदार हल्ला चढवित पौर्णिमेला काळा हत्ती द्यावयास भाग पाडून आपल्या विद्यापीठाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढले, तर दुसºया पटावर पुणे विद्यापीठाने सोलापूर विद्यापीठाचा ४-० ने पराभव केला.
चौथ्या फेरीअखेर, पुरुष गटात पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाने आघाडी घेतली असून, अमरावती विद्यापीठाने तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे.
महिला गटात पुणे विद्यापीठ आघाडीवर असून, मुंबई विद्यापीठ, एस.एन.डी.टी. मुंबई विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) दुसºया क्रमांकावर पोहोचले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महिला गटात इंदूर विद्यापीठाला बरोबरीत रोखले तर पुरुष संघाला उत्तर महाराष्ट्र संघाकडून कडव्या लढतीअंती हार पत्करावी लागला.
पाचव्या फेरीअखेर महिला गटात पुणे विद्यापीठाने मुंबई विद्यापीठावर खळबळजनक विजय नोंदविला. निमिता जोशीने दुसºया पटावर धनश्री पंडितला बरोबरीत रोखले. ईशिका सैनीने अंजली नेमलेकरचा पराभव केला.
सहाव्या फेरीत पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाबरोबर खेळेल, तर नागपूर विद्यापीठ राजस्थान विद्यापीठाबरोबर असेल. महिला गटात अतिशय कडव्या लढतीची अपेक्षा सर्व बुद्धिबळप्रेमी करीत आहेत.
पुरुष गटात पुणे विद्यापीठाने पाचव्या फेरीअखेर जोरदार बढत घेतली असून, दुसºया क्रमांकावर गुजरात विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, जबलपूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) समान गुणसंख्येवर आहे.

 

Web Title: Inter University Chess Competition: University of Pune dominates Kolhapur University!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.