काँग्रेस-वंचित एकत्र आल्यास पश्चिम वऱ्हाडात घड्याळाचे वाजणार बारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:45 PM2019-06-09T12:45:27+5:302019-06-09T12:48:31+5:30

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी तपासली असता पश्चिम वºहाडात वंचित व काँग्रेस एकत्र आल्यास ‘राष्टÑवादी काँग्रेसचे ‘बारा’ वाजतील, अशी स्थिती आहे.

If the Congress-Vanchit bahujan aaghadi come together NCP will flat in Wesh varhad | काँग्रेस-वंचित एकत्र आल्यास पश्चिम वऱ्हाडात घड्याळाचे वाजणार बारा!

काँग्रेस-वंचित एकत्र आल्यास पश्चिम वऱ्हाडात घड्याळाचे वाजणार बारा!

Next

- राजेश शेगोकार
अकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेकाँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या विजयाची समीकरणे बिघडविली. यापासून धडा घेत आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वंचितला सोबत घेण्याबाबत दबाव वाढत आहे. वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांना असलेला विरोध पाहता काँग्रेस व वंचितने एकत्र यावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. या पृष्ठभूमीवर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी तपासली असता पश्चिम वºहाडात वंचित व काँग्रेस एकत्र आल्यास ‘राष्टÑवादी काँग्रेसचे ‘बारा’ वाजतील, अशी स्थिती आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीमधील मित्रपक्ष स्वबळावर लढले होते. पश्चिम वºहाडात काँग्रेसने तीन जागा, भारिप-बमसंने एक जागा जिंकून आपले अस्तित्व टिकविले; मात्र राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे, पंधरा मतदारसंघांपैकी केवळ अकोला पश्चिम या एकमेव मतदारसंघात राष्टÑवादीने दुसºया क्रमांकाची मते घेतली. इतर एकाही मतदारसंघात राष्टÑवादीला दुसरा क्रमांकही घेता आलेला नाही. ज्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी दुसºया क्रमांकावर आहे, तिथे भारिप-बमसं तिसºया क्रमांकावर असून, दोघांच्या मतांमध्ये दोन हजारांचेच अंतर आहे. भारिप-बमसंने सर्वच मतदारसंघांत चांगली मते घेतली असल्याने भारिप व काँग्रेसची ताकद एकत्र आणण्याबाबत पदाधिकाºयांचा दबाव वाढता आहे. असे झाल्यास राष्टÑवादी काँग्रेसच्या समोर मोठे आव्हान उभे ठाकू शकते.

 

Web Title: If the Congress-Vanchit bahujan aaghadi come together NCP will flat in Wesh varhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.