महापौरांच्या हस्ते गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 02:38 PM2018-11-28T14:38:26+5:302018-11-28T14:39:08+5:30

अकोला: गोवर तसेच रुबेला या विषाणूपासून जीवघेणे आजार होतात. या आजारावर मात करण्यासाठी आजपासून राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले.

  Gower, Rubella vaccination campaign launched by the Mayor | महापौरांच्या हस्ते गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

महापौरांच्या हस्ते गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

googlenewsNext

अकोला: गोवर तसेच रुबेला या विषाणूपासून जीवघेणे आजार होतात. या आजारावर मात करण्यासाठी आजपासून राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले. मंगळवारी महापौरांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. ही मोहीम आणखी २० दिवस राहणार आहे.
शहरात मंगळवारपासून गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत वयाची ९ महिने पूर्ण केल्यापासून ते १५ वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना मोफत लसीकरण केले जाणार आहे. रुबेला आजारामुळे गर्भवती माता किंवा तिच्या बाळाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता राहते. मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेच्या वतीने शहरात विविध दहा ठिकाणी नागरी आरोग्य केंद्रे कार्यरत करण्यात आले आहेत. या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जात आहे. महापौर विजय अग्रवाल यांच्यासह जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश पगारे, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, डॉ. प्रभाकर मुद्गल यांची उपस्थिती होती. यावेळी महापौर अग्रवाल यांच्या हस्ते लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. डाबकी रोडवर उपमहापौर वैशाली शेळके तसेच लक्कडगंज येथील मनपा शाळेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

१ लाख १५ हजार ४१६ बालकांना लस!
गोवर व रुबेला लसीकरण मोहीम तीन टप्प्यात राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रातील शाळा व अंगणवाडीतील १ लाख १५ हजार ४१६ बालकांना लस दिल्या जाईल. यासाठी मनपाने ८३४ लसीकरण सत्र आयोजित केले आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर दोन टप्प्यात मोहीम राबवली जाईल. मोहिमेच्या पहिल्या दिवशी ५ हजार ६८३ विद्यार्थ्यांपैकी एकूण ३४५९ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

 

 

Web Title:   Gower, Rubella vaccination campaign launched by the Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला