कापशी तलावाचे पाणी माझोड गावाला द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 07:39 PM2017-11-22T19:39:36+5:302017-11-22T19:46:28+5:30

कापशी तलावात नौका विहार करून मौजमजा करण्यापेक्षा या तलावासाठी  विस्थापित झालेल्या माझोड गावाला पिण्यासाठी तसेच उपसा सिंचन पद्धतीने शे तीसाठी पाणी द्या, अशा मागणीचे निवेदन व प्रस्ताव सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी  केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत, तर  राज्याचे जलसंधारणमंत्री ना. राम शिंदे यांना अकोल येथे प्रत्यक्षात दिला. 

Give water to the village of Kapash lake! | कापशी तलावाचे पाणी माझोड गावाला द्या!

कापशी तलावाचे पाणी माझोड गावाला द्या!

Next
ठळक मुद्देसरपंच ज्योत्स्ना खंडारे यांची मागणीकेंद्र व राज्य जलसंधारण मंत्र्यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क 
माझोड : कापशी तलावात नौका विहार करून मौजमजा करण्यापेक्षा या तलावासाठी  विस्थापित झालेल्या माझोड गावाला पिण्यासाठी तसेच उपसा सिंचन पद्धतीने शे तीसाठी पाणी द्या, अशा मागणीचे निवेदन व प्रस्ताव सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी  केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत, तर  राज्याचे जलसंधारणमंत्री ना. राम शिंदे यांना अकोल येथे प्रत्यक्षात दिला. 
सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, की माझोड गाव हे  इंग्रजकालीन काळात कापशी तलावानजीक वसलेले होते. तेव्हा सदर तलावातून  अकोला शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा चालू होता. त्यामुळे या तलावातील  पाण्याची शुद्धता राखण्यासाठी तत्कालीन इंग्रज व्हाईसलरने माझोड गाव या  ठिकाणाहून १९१७-१८ साली उठवले आणि कापशी तलावापासून ४ कि.मी अं तरावर भरतपूरजनीक बसविले. तेव्हा खर्‍या अर्थाने अकोला शहराला पाणी पुरवठा  करण्यासाठी माझोड गाव विस्थापित झाले होते. आता गावाला पाणी टंचाईच्या तीव्र  झळा पोहचत आहेत. यावर्षी नळ योजनेच्या पाणी पुरवठा विहिरीत पाणी  नसल्यामुळे गावाला पाणी पुरवठा कोठून करावा, असा प्रश्न उभा आहे. त्यामुळे  तलावाचे पाणी माझोड गावाला पिण्यासाठी तसेच शेतकर्‍यांना सिंचनासाठी देण्यात  यावे; अन्यथा गावकरी लढा उभारतील, असा इशारा खंडारे, उपसरपंच विद्याधर  बराटे, ग्रा.पं. सदस्य राजेश इकरे, पदमा ताले, सारिका नेरकर व सर्व सदस्यांनी दिला  आहे. 

Web Title: Give water to the village of Kapash lake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.