अकोला तहसील कार्यालयातील प्रतीक्षालयात आग; जुने साहित्य, रेकॉर्ड जळाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 09:43 AM2018-02-07T09:43:32+5:302018-02-07T09:43:54+5:30

अकोला तहसील कार्यालयातील प्रतीक्षालय इमारतीमध्ये मंगळवारी ९ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्रतीक्षालयातील जुने साहित्य व दस्तावेज (रेकॉर्ड) जळाले.

 Fire at the waiting room of Akola Tehsil office; Old literature, records burned! | अकोला तहसील कार्यालयातील प्रतीक्षालयात आग; जुने साहित्य, रेकॉर्ड जळाले!

अकोला तहसील कार्यालयातील प्रतीक्षालयात आग; जुने साहित्य, रेकॉर्ड जळाले!

Next

अकोला : अकोला तहसील कार्यालयातील प्रतीक्षालय इमारतीमध्ये मंगळवारी ९ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्रतीक्षालयातील जुने साहित्य व दस्तावेज (रेकॉर्ड) जळाले असून, रात्री १0 वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली.
अकोला तहसील कार्यालय परिसरात प्रतीक्षालय इमारतीमध्ये तहसील कार्यालयातील जुने टेबल-खुच्र्यांंसह इतर साहित्य तसेच जुने दस्तावेज ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री प्रतीक्षालय इमारतीमध्ये अचानक आग लागली. त्यामध्ये जुने साहित्य आणि दस्तावेज जळाले. 
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजेश्‍वर हांडे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम यांच्यासह महानगरपालिका अग्निशामक दलाचे दोन बंब दाखल झाले. रात्री १0 वाजताच्या सुमारास आग नियंत्रणात आली. आगीचे कारण कळू शकली नाही. 

अकोला तहसील कार्यालयातील प्रतीक्षालय इमारतीमध्ये आग लागली. आगीत जुने साहित्य व कामाचे नसलेले जुने ‘रेकॉर्ड’ जळाले. 
- राजेश्‍वर हांडे, तहसीलदार, अकोला.
 

Web Title:  Fire at the waiting room of Akola Tehsil office; Old literature, records burned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.