शेतकऱ्यांना मिळणार तूर ‘भावांतर’ अनुदानाची रक्कम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:35 PM2018-11-25T12:35:27+5:302018-11-25T12:36:12+5:30

अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केली; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांसाठी भावांतर योजनेंतर्गत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून, अनुदानाची रक्कम शासनामार्फत मंजूर करण्यात आली.

Farmers will get amount of subsidy! | शेतकऱ्यांना मिळणार तूर ‘भावांतर’ अनुदानाची रक्कम!

शेतकऱ्यांना मिळणार तूर ‘भावांतर’ अनुदानाची रक्कम!

Next

- संतोष येलकर
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केली; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांसाठी भावांतर योजनेंतर्गत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून, अनुदानाची रक्कम शासनामार्फत मंजूर करण्यात आली. त्यामुळे अखेर जिल्ह्यातील २२ हजार ३६८ शेतकºयांना तूर अनुदानाच्या रकमेचा लाभ लवकरच मिळणार आहे.
आधारभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीत गत १५ मेपर्यंत जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा, पारस, बार्शीटाकळी, अकोट व मूर्तिजापूर इत्यादी आठ केंद्रांवर तूर खरेदी करण्यात आली. मुदत संपुष्टात आल्यानंतर नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात आल्याने, तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करूनही जिल्ह्यातील २२ हजार ३६८ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली नाही. या पृष्ठभूमीवर तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही, अशा तूर उत्पादक शेतकºयांसाठी भावांतर योजनेंतर्गत शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले. गत जून महिन्यात अनुदान जाहीर करण्यात आले असले तरी अद्याप तूर अनुदान शेतकºयांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे तुरीचे अनुदान मिळणार तरी केव्हा, यासंदर्भात शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात असतानाच, भावांतर योजनेंतर्गत शासनामार्फत तूर अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आली. त्यामुळे आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही, अशा जिल्ह्यातील २२ हजार ३६८ शेतकºयांना तूर अनुदानाचा लवकरच लाभ मिळणार आहे.

शेतकºयांच्या याद्या पणन महासंघाकडे!
तूर अनुदानास पात्र जिल्ह्यातील १३ हजार ९०० शेतकºयांच्या याद्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत, तसेच ८ हजार ४६८ शेतकºयांच्या याद्या विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अकोला शाखेमार्फत लवकरच पणन महासंघाच्या मुंबई येथील कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.

३० नोव्हेंबरपर्यंत अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात!
तूर अनुदानासाठी पात्र जिल्ह्यातील शेतकºयांच्या याद्या पणन महासंघाकडे पाठविण्यात आल्या असून, अनुदानाची मंजूर रक्कम ३० नोव्हेंबर संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: Farmers will get amount of subsidy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.