‘एटीएम’च्या प्रत्येक व्यवहारातून मिळाले आठशे रुपये कमी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:20 AM2018-04-07T01:20:04+5:302018-04-07T01:20:04+5:30

अकोला : एटीएम च्या कॅसेटमध्ये बिघाड झाल्याने  प्रत्येक ग्राहकाच्या व्यवहारातील आठशे रुपये गिळंकृत केले. ही घटना सोमवारी सायंकाळी तुकाराम चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये घडली. एका पाठोपाठ एक ग्राहकाला आठशे रुपये कमी येत असल्याने अनेकांना धक्का बसला. ही बाब बँकेच्या अधिकार्‍यांना कळताच त्यांनी तातडीने एटीएम सेवा सायंकाळी बंद केली.

Eight hundred rupees less in every transaction of ATM! | ‘एटीएम’च्या प्रत्येक व्यवहारातून मिळाले आठशे रुपये कमी! 

‘एटीएम’च्या प्रत्येक व्यवहारातून मिळाले आठशे रुपये कमी! 

googlenewsNext
ठळक मुद्दे‘एचडीएफसी’ बँकेत ग्राहकांची धाव ‘कॅसेट’मध्ये बिघाड झाल्याने गोंधळ 

अकोला : एटीएम च्या कॅसेटमध्ये बिघाड झाल्याने  प्रत्येक ग्राहकाच्या व्यवहारातील आठशे रुपये गिळंकृत केले. ही घटना सोमवारी सायंकाळी तुकाराम चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये घडली. एका पाठोपाठ एक ग्राहकाला आठशे रुपये कमी येत असल्याने अनेकांना धक्का बसला. ही बाब बँकेच्या अधिकार्‍यांना कळताच त्यांनी तातडीने एटीएम सेवा सायंकाळी बंद केली.
तुकाराम चौकातील एचडीएफसीच्या एटीएमवर सोमवारी सायंकाळी आधी एका ग्राहकाने काही रक्कम काढली. त्या व्यक्तीला स्लिपवर हिशेब व्यवस्थित दिसत असला तरी आठशे रुपये कमी आले. हा व्यक्ती विचार करीत असताना एटीएमवरून व्यवहार करणार्‍या दुसर्‍या व्यक्तीलाही तोच अनुभव आला. असाच अनुभव लागोपाठ आठ जणांना आला. ज्याने एक हजार रुपये काढले त्याचे हाती केवळ दोनशे रुपये आल्याने मात्र येथील वातावरण तापले. एटीएमच्या सिक्युरिटीवर या ग्राहकांनी धाव घेतली. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून घडत असलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हे एटीएम तातडीने शटर ओढून बंद करण्यात आले. 
नोटा मोजणीच्या कॅसेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एटीएमने लागोपाठ आठशे रुपये गिळल्याचे तपासात समोर आले. आता ज्यांनी तक्रार केली त्यांचे आठशे रुपये संबंधित बँकेच्या खात्यात वळते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हा तांत्रिक बिघाड आहे. एटीएममधील व्यवहाराची नोंद ऑनलाइन आणि प्रीन्टद्वारे ऑटोमॅटिक होत असते. ज्या व्यक्तींनी तक्रार केली आहे, त्यांची रक्कम खात्यात वळती केली जाईल. मात्र, ज्यांनी तक्रार केली नाही, त्यांची रक्कम सिस्टीममध्ये पडून राहील, असा प्रकार घडल्यास ग्राहकांनी तातडीने संपर्क साधवा.
-नरेंद्र अंबुसकर, उप व्यवस्थापक, एचडीएफसी बँक अकोला.

Web Title: Eight hundred rupees less in every transaction of ATM!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.