चमत्कार म्हणजे बनावाबनवी , हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका - डॉ. स्वप्ना लांडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:38 PM2017-12-19T16:38:47+5:302017-12-19T16:39:31+5:30

अकोला- महालक्ष्मी हलल्या,  दरवाज्यापर्यंत आल्या, कुठल्यातरी बाबाने अंगारा, तिर्थ, खडीसाखरेच प्रसाद निर्माण केला, हातावर जळता कापूर घेतला असे चमत्कार केल्याचा दावा अनेकदा केला जातो. पण असा कुठलाही चमत्कार होत नाही,  असे चमत्कार म्हणजे बनावाबनवी आहे, हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका असे आवाहन अ.भा. अनिसच्या वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख डॉ स्वप्ना लांडे  यांनी केले. 

Do not fall prey to miracles, handcuffs - Dr.swapna Lande | चमत्कार म्हणजे बनावाबनवी , हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका - डॉ. स्वप्ना लांडे 

चमत्कार म्हणजे बनावाबनवी , हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका - डॉ. स्वप्ना लांडे 

Next
ठळक मुद्दे मलकापूर मधील साने गुरूजी शाळेमध्ये अ.भा. अनिसच्या वतिने ‘बाबा ते बाबा’ या अभियान. विद्यार्थ्यांकडूनही जळता कापूर हातावर घेऊन नंतर मुखात टाकण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले.

साने गुरूजी शाळेमध्ये अंधश्रद्धेविरोधात जनजागृती 
अकोला- महालक्ष्मी हलल्या,  दरवाज्यापर्यंत आल्या, कुठल्यातरी बाबाने अंगारा, तिर्थ, खडीसाखरेच प्रसाद निर्माण केला, हातावर जळता कापूर घेतला असे चमत्कार केल्याचा दावा अनेकदा केला जातो. पण असा कुठलाही चमत्कार होत नाही,  असे चमत्कार म्हणजे बनावाबनवी आहे, हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका असे आवाहन अ.भा. अनिसच्या वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख डॉ स्वप्ना लांडे  यांनी केले. 
स्थानिक मलकापूर मधील साने गुरूजी शाळेमध्ये अ.भा. अनिसच्या वतिने ‘बाबा ते बाबा’ या अभियानात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी साने गुरूजी शाळेचे मुख्याध्यापक संजय इंगळे हे होते तर मंचावर अ.भा.अनिसचे भारत भाऊ इंगोले , पातुर तालुका संघटक राठोड सर , महिला संघटिका  संध्याताई देशमुख अ मीनल इंगोले आदी उपस्थित होते. साने गुरूजी शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक प्रात्यक्षिके दाखवित डॉ. लांडे यांनी अंधश्रद्धा कशी फैलावते हे स्पष्ट करून सांगीतले. विद्यार्थ्यांनी अशा चमत्काराच्या मागे लागु नये, चमत्कारामागे जे बनावबनवी असती ती शोधावी, कुठल्याही चमत्काराने यश मिळत नाही त्यासाठी परिश्रम करावे लागतात अभ्यास करावा लागतो हे स्पष्ट करून सांगतांना डॉ.लांडे यांनी अनेक उदाहरणे दिली. जळत्या निखाºयावर चालणे हा चमत्कार नाही तर ती साधी वैज्ञानिक क्रीया आहे हे त्यांनी हातात जळता कापूर घेऊन करून दाखविले. विद्यार्थ्यांकडूनही जळता कापूर हातावर घेऊन नंतर मुखात टाकण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. मुलांशी संवाद साधत झालेले हे मार्गदर्शन अतिशय रंजक व प्रभावी ठरले. संध्याताई देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना अनेक प्रयोग करून दाखविले शालेय वयापासूनच चौकस बुद्धी ठेवली तर अंधश्रद्धेचा प्रसार होणार नाही असे त्यांनी सांगीतले.

Web Title: Do not fall prey to miracles, handcuffs - Dr.swapna Lande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.