चोहोट्टा बाजार येथे टिप्परखाली आल्याने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 02:00 IST2018-01-25T02:00:12+5:302018-01-25T02:00:28+5:30

चोहोट्टा बाजार : टिप्परच्या खाली आल्याने एक ४0 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना २४ जानेवारीच्या संध्याकाळी चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर घडली.

The cyclists killed under the tip of the market | चोहोट्टा बाजार येथे टिप्परखाली आल्याने दुचाकीस्वार ठार

चोहोट्टा बाजार येथे टिप्परखाली आल्याने दुचाकीस्वार ठार

ठळक मुद्दे२४ जानेवारीच्या संध्याकाळी चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
चोहोट्टा बाजार : टिप्परच्या खाली आल्याने एक ४0 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना २४ जानेवारीच्या संध्याकाळी चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर घडली.
अकोल्यावरून २४ जानेवारीच्या संध्याकाळी अकोटकडे जाणार्‍या एमएच ३0 एबी ४६३१ क्रमांकाच्या टिप्परखाली चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर एक दुचाकी आली. या अपघातात वरूर जऊळका येथील विकास तुळशिदास नायसे (४0) या इसमाचा जागीच मृत्यू झाला.  हा अपघात मुख्य महामार्गावर झाल्याने अकोला-अकोट मार्गावरील वाहतूक मोठय़ा प्रमाणात ठप्प झाली होती. या अपघाताबाबत माहिती मिळताच अकोटचे उप विभागीय पोलीस अधिकारी इंगळे, ठाणेदार गणेश वनारे यांनी  घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. यानंतर विकास नायसे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आला. हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून टिप्परचा चालक फरार झाला होता. या प्रकरणी दहीहांडा पोलीस तपास करीत असून, हे वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

 

 

Web Title: The cyclists killed under the tip of the market