बांधकाम साहित्य उठले अकोलेकरांच्या जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:44 PM2019-06-07T12:44:59+5:302019-06-07T12:45:06+5:30

अकोला: इमारतींचे बांधकाम करताना चक्क रस्त्यावर तसेच सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य टाकून अकोलेकरांच्या जीवावर उठणाºया मालमत्ताधारकांची महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी पाठराखण करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

The construction material on the road, citizen get problems | बांधकाम साहित्य उठले अकोलेकरांच्या जीवावर!

बांधकाम साहित्य उठले अकोलेकरांच्या जीवावर!

googlenewsNext


अकोला: इमारतींचे बांधकाम करताना चक्क रस्त्यावर तसेच सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य टाकून अकोलेकरांच्या जीवावर उठणाºया मालमत्ताधारकांची महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी पाठराखण करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी रस्त्यावरील बांधकाम साहित्य न हटविल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश जारी केला होता. या आदेशाला झोन अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असली तरी यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे.
शहराच्या कानाकोपºयात विविध इमारतींचे बांधकाम जोरात सुरू आहे. बांधकाम करताना संबंधित मालमत्ताधारकांकडून विटा, रेती, गिट्टी, लोखंड तसेच इतर साहित्य ठेवण्यासाठी चक्क रस्ते किंवा सार्वजनिक जागेचा वापर केला जात आहे. नगररचना विभागाच्या नियमानुसार बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवता येत नाही. मालमत्ताधारकाने खासगी मालमत्तेवर आवारभिंत उभारून त्यामध्ये साहित्य ठेवणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या नियमांची ऐशीतैशी करीत बांधकाम करणाºयांनी चक्क रस्त्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे संबंधित परिसरातून वाहतूक करणाºया वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या रेती, गिट्टीमुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. संबंधित मालमत्ताधारकाला हटकल्यास किंवा सूचना केल्यास त्यांच्याकडून अरेरावीची भाषा केली जाते. याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे पाहून रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हा प्रकार लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाºया मालमत्ताधारकांना दंड बजावण्याचा निर्णय घेत तसे निर्देश जारी केले होते. या निर्देशांकडे क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग व आरोग्य निरीक्षकांनी सपशेल पाठ फिरवली आहे.

महापालिका सुस्त; अकोलेकरांचा जीव धोक्यात
रस्त्यावरील बांधकाम साहित्य न हटविल्यास ते जप्त करण्यासोबतच दंड बजावण्याची कारवाई मनपाच्या नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग, आरोग्य-स्वच्छता विभाग व झोन अधिकाºयांनी संयुक्तरीत्या करणे अपेक्षित आहे. मनपाच्या तीनही विभागाकडून या विषयाकडे दुर्लक्ष होत असेल तर मनपाचा कारभार किती सक्षमपणे सुरू आहे, याचा अकोलेकरांना अनुभव येत आहे.

इशारा तुडवला पायदळी
कमर्शियल कॉम्प्लेक्स असो वा रहिवासी इमारती किंवा घरांचे बांधकाम साहित्य रस्त्यावर असेल तर तीन दिवसांत ते तातडीने हटविण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले होते. साहित्य न हटविल्यास ते जप्त करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. रस्त्यांवर बांधकाम साहित्याचे ढीग पाहता मालमत्ताधारकांनी मनपाचा इशारा पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे.

 

Web Title: The construction material on the road, citizen get problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.