मेहुणाराजा येथे चोखोबा जन्मोत्सव

By Admin | Published: January 14, 2015 12:27 AM2015-01-14T00:27:35+5:302015-01-14T00:27:35+5:30

पालखी सोहळा; बुलडाणा जिल्हा परिषदेकडून जय्यत तयारी.

Chokhoba Janmotsav at Mahunakarija | मेहुणाराजा येथे चोखोबा जन्मोत्सव

मेहुणाराजा येथे चोखोबा जन्मोत्सव

googlenewsNext

मेहुणाराजा (बुलडाणा): वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ चोखामेळा यांचा ७४७ वा जन्मोत्सव सोहळा मेहुणाराजा येथे जिल्हा प्रशासन व गावकर्‍यांच्या वतीने साजरा होत आहे.
तत्कालीन जि.प. अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव सोहळा प्रशासनाच्या वतीने साजरा करावा असा जि.प. मध्ये ठराव घेऊन निधीचीही तरतूद केली होती. तेव्हापासून हा कार्यक्रम येथे साजरा केला जातो. त्यानुसार उद्या १४ जानेवारी रोजी ७ ते ७.३0 पर्यंंत महापूजा होणार असून, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अलका चित्रांगण खंडारे, आमदार डॉ. शशीकांत खेडेकर उपस्थित राहणार आहेत. ७.३0 ते ११.३0 पर्यंंत दिंडी सोहळा, ११.३0 ते १२.३0 पर्यंंत काल्याचे कीर्तन होणार आहे.
यानंतर आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पांडुरंगदादा खेडेकर हे राहणार आहेत. पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी या जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन मेहुणाराजा येथील गावकर्‍यांनी केले आहे.

*विकासाचे धोरण ठरवा
संत चोखामेळा यांच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या मेहुणाराजा येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा तसेच जिल्हा परिषदेचा विकास आराखडा राबविण्यात आला; मात्र एक सभामंडप उभारण्यापलीकडे या परिसराचा विकास झालेला नाही. तीर्थक्षेत्र म्हणून या परिसराचा विकास करण्याची गरज असून, त्यासाठी निश्‍चित असे धोरण ठरविण्याची गरज आहे.

Web Title: Chokhoba Janmotsav at Mahunakarija

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.