चॅलेंजर ट्रॉफी: अकोल्याचा नयन चव्हाण इंडिया रेड संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 04:28 PM2018-11-05T16:28:25+5:302018-11-05T16:29:12+5:30

१९ वर्षाखालील चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेसाठी इंडिया रेड संघात अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा अष्टपैलु खेळाडू नयन चव्हानची निवड झाली आहे.

Challenger Trophy: Akola Nayan Chavan in India Red Team | चॅलेंजर ट्रॉफी: अकोल्याचा नयन चव्हाण इंडिया रेड संघात

चॅलेंजर ट्रॉफी: अकोल्याचा नयन चव्हाण इंडिया रेड संघात

Next

अकोला : लखनऊ येथे १० ते १६ नोव्हेंबर या कालावधीत होणार असलेल्या १९ वर्षाखालील चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेसाठी इंडिया रेड संघात अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा अष्टपैलु खेळाडू नयन चव्हानची निवड झाली आहे. यापूर्वी नयन ने १९ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या शिबिराचे प्रतिनिधीत्व केले आहे. याशिवाय त्याने मध्यविभाग संघ व १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफीमध्ये भारतीय ब्लू संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. नयन ने १४, १६ व १९ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधीत्वही केले असून, नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील विनू मंकड क्रिकेट स्पर्धेत नयनने छत्तीसगढ व मध्यप्रदेश संघाविरुद्ध शतक ठोकले होते, अशी माहिती विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा संयोजक तथा अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी दिली.

Web Title: Challenger Trophy: Akola Nayan Chavan in India Red Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला