बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या कारला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:43 AM2018-01-25T01:43:12+5:302018-01-25T01:43:17+5:30

अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार व कौलखेडमधील रहिवासी दादाराव काकड यांच्या वाहनांमध्ये अपघात झाल्याची घटना न्यायालयासमोर बुधवारी सकाळी घडली. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, दोन्ही कारचे नुकसान झाले.

Balapur constituency MLA Baliram Sircar's car accident | बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या कारला अपघात

बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या कारला अपघात

Next
ठळक मुद्देअपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार व कौलखेडमधील रहिवासी दादाराव काकड यांच्या वाहनांमध्ये अपघात झाल्याची घटना न्यायालयासमोर बुधवारी सकाळी घडली. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, दोन्ही कारचे नुकसान झाले.
आ. बळीराम सिरस्कार हे रेल्वे स्टेशनकडून टॉवर चौकाकडे येत असताना त्यांच्या कारचा दादाराव काकड यांच्या कारसोबत अपघात झाला. 
या अपघातात दोन्ही कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मात्र, जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.  त्यानंतर दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी रात्री उशिरा रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार झाल्याची माहिती आहे.

Web Title: Balapur constituency MLA Baliram Sircar's car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.