मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का? - नाना पटोले यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 03:50 PM2017-12-05T15:50:42+5:302017-12-05T18:58:26+5:30

अकोला : विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांनी विचलित होणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे सरकारवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची भाषा करत होते. तेच फडणविस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे कसे बदलले. शेतकऱ्यांच्या  छोट्या मागण्याही मान्य न करणारे फडणवीस आता शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का, असा घणाघाती सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मंगळवारी अकोला येथे केला.

Are the Chief Minister waiting for farmers' suicides? - The question of Nana Patole | मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का? - नाना पटोले यांचा सवाल

मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का? - नाना पटोले यांचा सवाल

ठळक मुद्देअकोल्यात शेतकरी आंदोलनस्थळाला दिली भेट.राज्यसरकार व प्रशासनाचा केला जाहीर धिक्कार.

- अतुल जयस्वाल

अकोला : विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांनी विचलित होणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे सरकारवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची भाषा करत होते. तेच फडणविस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे कसे बदलले. शेतकऱ्यांच्या  छोट्या मागण्याही मान्य न करणारे फडणवीस आता शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का, असा घणाघाती सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मंगळवारी अकोला येथे केला.
शेतकºयांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. प्रशासनासोबतची बोलणी फिसकटल्याने निर्धारावर ठाम असलेल्या यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकºयांना पोलिसांनी स्थानबद्ध करून पोलिस मुख्यालयात आणले. रात्रभर या ठिकाणी ठाण मांडून बसलेले यशवंत सिन्हा व शेतकºयांचे आंदोलन मंगळवारी दुसºया दिवशीही सुरुच आहे. या आंदोलन स्थळाला नाना पटोले यांनी दुपारच्या सुमारास भेट देऊन शेतकºयांना संबोधित केले. 
ते पुढे म्हणाले, आतापर्यंत कोणत्याच सरकारांनी शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांच्या  मागण्या या रास्त असतानाही शासन आठमुठे होऊन बसले आहे. शेतकºयांना गतवर्षी विकलेल्या तुरीचे पैसे आतापर्यंत मिळत नाहीत. सरकारी खरेदी केंद्रे ही नुसती नावापुरतीच आहेत. शेतकºयांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी यशवंत सिन्हा यांच्यासारखा  केंद्रपातळीवरील मोठा नेता अकोल्यात येऊन आंदोलन करतो आणि येथील प्रशासन राज्य सरकारच्या इशाºयावर त्यांना अपमानास्पद वागणूक देते. एवढ्या मोठ्या नेत्याला साधं चहा-पाणी ही विचारले नाही. हा यशवंत सिन्हा यांचा नव्हे, तर संपूर्ण शेतकºयांचाच अपमान आहे, असा घणाघाती आरोप करीत नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी यशवंत सिन्हा, रविकांत तूपकर, शेतकरी जागर मंचाचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता नाही
भापजने निवडणूकीला सामोरे जाताना कापसाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल देण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार आहे. कापसाला भाव मात्र चार हजारच्यावर मिळत नाही. शेतकºयांसाठी काम करण्याचे आश्वासन देऊन हे सरकार केवळ काही लोकांच्या भल्यांसाठी काम करत आहे. आणि हेच नाना पटोलेच दुखणं आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

सिन्हांच्या आंदोलनात वरुण गांधी, अरुण शौरीही येणार
 राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या  मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. यासाठी देशपातळीवरील नेत्यांच्या संपर्कात असून भाजपचे खासदार वरूण गांधी व माजी मंत्री अरुण शौरी यांनी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. 

Web Title: Are the Chief Minister waiting for farmers' suicides? - The question of Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.