Akola: ऑक्टोबर महिन्यात विविध खगोलीय घडामोडींची पर्वणी

By Atul.jaiswal | Published: September 30, 2023 12:49 PM2023-09-30T12:49:49+5:302023-09-30T12:50:08+5:30

Akola: नैऋत्य मोसमी वारे परतीला लागल्यानंतर आकाश निरीक्षण करणे अधिक सोयीचे होत असते. आगामी ऑक्टोबर महिन्यात सूर्य व चंद्र अशी दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव, ग्रहांच्या चंद्र व ताऱ्यांसोबत युती, ग्रहांचे उदयास्त आदींची रेलचेल असल्याने समस्त आकाश प्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

Akola: Observance of various celestial events in the month of October | Akola: ऑक्टोबर महिन्यात विविध खगोलीय घडामोडींची पर्वणी

Akola: ऑक्टोबर महिन्यात विविध खगोलीय घडामोडींची पर्वणी

googlenewsNext

- अतुल जयस्वाल
अकोला - नैऋत्य मोसमी वारे परतीला लागल्यानंतर आकाश निरीक्षण करणे अधिक सोयीचे होत असते. आगामी ऑक्टोबर महिन्यात सूर्य व चंद्र अशी दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव, ग्रहांच्या चंद्र व ताऱ्यांसोबत युती, ग्रहांचे उदयास्त आदींची रेलचेल असल्याने समस्त आकाश प्रेमींसाठी ही अनोखी पर्वनी ठणार आहे.पृथ्वीवरून आपण पाच ग्रह, पाऊणेपाच हजार तारे आणि ८८ तारका समूह साध्या डोळ्यांनी सहज पाहू शकतो. सध्या स्थितीत गुरु शुक्र आणि शनि हे तीन महाग्रह आकाशात अतिशय विलोभनीय दर्शन देत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी बुध कन्या राशीत व शूक्र सिंह राशीत प्रवेश करेल. ३ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचा पश्चिमेस अस्त, ६ ऑक्टोबरला रात्री ७ वाजता इंटर नॅशनल स्पेस स्टेशन दर्शन, ७ ऑक्टोबरला बुध ग्रहाचा पूर्वेकडे अस्त होत आहे. दि.७, ८व ९रोजी रात्री ड्रेक्रोनिड तारका समूहातून आणि २१व २२ ऑक्टोबर रोजी मृग नक्षत्र समुहातून ताशी वीस एवढ्या उल्का पडताना दिसतील.

सध्या अगदी रात्रीच्या प्रारंभी सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि वलयांकित ग्रह शनी हा रात्रीच्या प्रारंभी ते पहाटे पर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे दर्शन देत आहे. शनी ग्रह सध्या कुंभ राशी समूहात आहे. त्यानंतर रात्री साडे आठ नंतर पूर्व क्षितिजावरच सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरु ग्रह हा आपल्याला अगदी ठळकपणे पहाटेपर्यंत पाहता येईल. त्यानंतर पहाटेच्या निवांत वेळी पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा शुक्र ग्रह आपल्याला चांगल्यापैकी बघता येईल. या तिन्ही ग्रहांचे दूर्बिणीतून दर्शन केल्यास आपल्याला शनी ग्रहाचे सुंदर वलय, आणि गुरु ग्रहाचे चार चंद्र चांगल्यापैकी पाहता येतील. तसेच पहाटेच्या वेळी शुक्र ग्रहाच्या चंद्रासारख्या कला बघता येतील. असा हा अनोखा आकाश नजारा प्रत्येकाने आपल्या डोळ्यात साठवावा, असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

२८ ऑक्टोबरला खंडग्रास चंद्रग्रहण
आगामी ऑक्टोबर महिन्यात सूर्य व चंद्रग्रहणाचा योग आहे. यापैकी १४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्य ग्रहण आहे, पण भारतात ते दिसणार नाही. शनिवार, २८रोजी मध्यरात्री नंतर होणारे खंडग्रास चंद्रग्रहण सूमारे सव्वा तास बघता येईल.

Web Title: Akola: Observance of various celestial events in the month of October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला