दिव्यांग मतदारांना साह्यासाठी अकोला ऑटो संघटनेचा पुढाकार!

By रवी दामोदर | Published: April 16, 2024 07:23 PM2024-04-16T19:23:05+5:302024-04-16T19:23:46+5:30

मतदान केंद्रापर्यंत विनामुल्य ने-आण करण्याचा घेतला निर्णय.

Akola Auto Associations initiative to help disabled voters | दिव्यांग मतदारांना साह्यासाठी अकोला ऑटो संघटनेचा पुढाकार!

दिव्यांग मतदारांना साह्यासाठी अकोला ऑटो संघटनेचा पुढाकार!

अकोला : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ऑटो संघटनेने पुढाकार घेतला असून, दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विनामूल्य ने-आण करण्याचा निर्णय अकोला ऑटो संघटनेने घेतला आहे.अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांच्या दालनात अकोला ऑटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आहे. 

बैठकीत दिव्यांग मतदार मदत कक्षाचे नियंत्रण अधिकारी संजय राजनकर, कैलास ठाकूर, ऑटो युनियनचे अध्यक्ष संतोष शर्मा, रामेश्वर अहिर, मनीष कन्हेर, दीपक वगारे, अनिल भातुलकर, झाकिर खान, जाफर सेठ, सतीश वाघमारे आदी उपस्थित होते.

शहरातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अकोला महापालिकेच्या झोननिहाय चार ठिकाणी व  बसस्थानकाजवळ प्रत्येकी १० प्रमाणे एकूण ५० ऑटोरिक्षाची सेवा युनियनतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या नियंत्रण कक्षात दिव्यांगांसाठी एक हेल्पलाईन क्रमांक दिला जाणार आहे दिव्यांग मतदाराने दूरध्वनी केल्यावर संबंधित झोनमधील रिक्षा त्या दिव्यांगापर्यंत पोहोचून त्याला मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 
नियुक्त झोनल अधिकारी, पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचीही या उपक्रमासाठी मदत होणार आहे.  दिव्यांग मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन भालेराव यांनी केले.

Web Title: Akola Auto Associations initiative to help disabled voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला