अकोला-अमरावती मतदारसंघात अ.भा. मराठी नाट्य परिषदेची निवडणूक प्रक्रिया थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:29 AM2018-03-05T01:29:05+5:302018-03-05T01:29:05+5:30

अकोला : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या २0१८-२0१३ या पाच वर्षांच्या निवडणुकीसाठी राज्यभर मतदान झाले. मात्र, अकोला - अमरावती संयुक्त विभागामध्ये निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यात आल्याने मतदान होऊ शकले नाही. रविवार, ४ मार्च रोजी अकोला येथे प्रभात किड्स स्कूल व अमरावती येथे टाउन हॅालमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, ऐनवेळी अमरावतीचे अँड.  प्रशांत देशपांडे यांनी माघार घेतल्याने निवडणूक प्रक्रिया होऊ  शकली नाही.

Akola-Amravati constituency Election process of Marathi Natya Parishad stopped! | अकोला-अमरावती मतदारसंघात अ.भा. मराठी नाट्य परिषदेची निवडणूक प्रक्रिया थांबली!

अकोला-अमरावती मतदारसंघात अ.भा. मराठी नाट्य परिषदेची निवडणूक प्रक्रिया थांबली!

googlenewsNext
ठळक मुद्देअखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक-२0१८

नीलिमा शिंगणे-जगड । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या २0१८-२0१३ या पाच वर्षांच्या निवडणुकीसाठी राज्यभर मतदान झाले. मात्र, अकोला - अमरावती संयुक्त विभागामध्ये निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यात आल्याने मतदान होऊ शकले नाही. रविवार, ४ मार्च रोजी अकोला येथे प्रभात किड्स स्कूल व अमरावती येथे टाउन हॅालमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, ऐनवेळी अमरावतीचे अँड.  प्रशांत देशपांडे यांनी माघार घेतल्याने निवडणूक प्रक्रिया होऊ  शकली नाही.
अकोला जिल्हा मतदारसंघात अकोला शाखेचे अनिल कुळकर्णी, मलकापूर शाखेचे अशोक ढेरे आणि अमरावती शाखेचे अँड.  प्रशांत देशपांडे यांचे अर्ज दोन जागांसाठी दाखल झाले होते. त्यापैकी अँड.  प्रशांत देशपांडे यांनी अर्ज माघारी घेण्याच्या निश्‍चित तारखेपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. 
त्यानंतर निवडणुकीच्या आदल्या दिवशी मी निवडणूक लढू इच्छित नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांना कळविले. त्यामुळे अकोला-अमरावती विभागाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, असे आदेश पत्र मुंबईहून अकोल्यात धडकल्याने निवडणूक प्रक्रिया रविवारी होऊ शकली नाही. अमरावती शाखेतील २८0 व अकोला-मलकापूर शाखेतील ६१३ सदस्यांना निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली असल्याचे तातडीने कळविण्यात आले. अकोला-अमरावती विभागातील निवडणूक बिनविरोध जरी झाली असली, तरी तांत्रिकदृष्ट्या निवडणूक प्रक्रियेनुसार विजेत्यांची नावे जाहीर करता येणार नाहीत. जर अँड.  देशपांडे यांनी २५ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेतला असता, तर त्याचवेळी निवडणुकीतील उर्वरित दोन उमेदवारांची नावे विजयी म्हणून घोषित करण्यात आली असती.
अकोला शाखेचे अनिल कुळकर्णी व मलकापूर शाखेचे अशोक ढेरे यांच्या नावाची विजयी घोषणा अधिकृतरीत्या ७ मार्च रोजी होईल. निवडणुकीचा निकाल ७ मार्च रोजी जाहीर होणार असून, ज्यांना निवडणुकीबाबत लेखी तक्रार करायची असेल, त्यांच्यासाठी २0 मार्च ही मुदत देण्यात आली आहे. या लेखी तक्रारींचा निर्णय २५ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन करायचे असल्यामुळे अकोला नाट्यक्षेत्रात ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या मार्गदर्शनात लगबग पाहायला मिळाली होती. 

तांत्रिकदृष्ट्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नसल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. विजेत्यांची औपचारिक घोषणा ७ मार्चला होईल.
- मधु जाधव, ज्येष्ठ नाट्यकर्मी
-

Web Title: Akola-Amravati constituency Election process of Marathi Natya Parishad stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.