कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 02:45 PM2018-06-18T14:45:11+5:302018-06-18T14:45:11+5:30

अकोला : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर शेतीचे नवतंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निर्णय घेतला असून, सोयाबीन व कपाशी या पिकावर गंधक व खताचा वापर करू न आदिवासी शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

 Agricultural University's farming of tribal farmers! | कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर!

कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर!

Next
ठळक मुद्दे रासायनिक खत व्यवस्थापन प्रकल्पामार्फत आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. याची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील गोटा, माखला व दुनी या अतिदुर्गम गावातील आदिवासी शेतकºयांच्या शेतावर तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.

अकोला : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर शेतीचे नवतंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निर्णय घेतला असून, सोयाबीन व कपाशी या पिकावर गंधक व खताचा वापर करू न आदिवासी शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या कृषी विद्यापीठाने या अगोदरही आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विद्यापीठाने तंत्रज्ञान पोहोचवले आहे. यावर्षी या कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रकल्प व अखिल भारतीय दीर्घ मुदतीय रासायनिक खत व्यवस्थापन प्रकल्पामार्फत आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. याची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील गोटा, माखला व दुनी या अतिदुर्गम गावातील आदिवासी शेतकºयांच्या शेतावर तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.
गंधक या घटकाचा वापर करू न सोयाबीन व कपाशी या पिकाच्या उत्पादन वाढीची शिफारस विद्यापीठामार्फत करण्यात आली आहे. यानुषंगाने प्रामुख्याने सोयाबीन व कपाशी या पिकावर गंधक व खताचा वापर करू न आदिवासी शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाद्वारे निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी निविष्ठा प्रामुख्याने बियाणे व खते पुरविण्यात येणार आहेत. यावर्षी खरीप हंगामातील पेरणीपासून ते कापणीपर्यंत कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शेतकºयांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांना जमिनीतील मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये इत्यादी मिळून एकूण १७ घटकांची तपासणी करू न जमिनीची आरोग्य पत्रिका विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच शेतकºयांना विविध प्रकारच्या शेती व तंत्रज्ञानासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


- शाश्वत शेती उत्पादनासाठी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकºयांना प्रशिक्षण व मार्गदर्शनदेखील करण्यात येणार आहे.
- डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

Web Title:  Agricultural University's farming of tribal farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.