मुर्तीजापूर तालुक्यातील हिरपूर जवळ मालवाहूची दुचाकीस धडक; १ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 03:01 PM2022-11-20T15:01:50+5:302022-11-20T15:02:18+5:30
Accident News : ब्रम्ही येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे अध्यक्ष जाकीर हुसेन पटेल (नवाब) (६२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मूर्तिजापूर : तालुक्यातील हिरपूर जवळ आसरा रोडवर एका मालवाहु वाहनाने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने ब्रम्ही येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे अध्यक्ष जाकीर हुसेन पटेल (नवाब) (६२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान घडली.
ब्रम्ही येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे अध्यक्ष जाकीर हुसेन तसद्दुक हुसेन पटेल (नवाब) (६२) हे सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३० एक्स ७११६ ने मूर्तिजापूर वरुन ब्रम्ही येथील शेतात जात होते, दरम्यान पाठीमागून भरधाव येणाऱ्या मीनी मालवाहू (बुलेरो) क्रमांक एम एच २७ एक्स ७१६४ ने जाकीर हुसेन पटेल यांच्या दुचाकीला हिरपूर जवळ टिपटाळा वळणावर पाठीमागून जोरदार धडक दिली, त्या धडकेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीच्या मागच्या बाजूचा मालवाहूच्या समोरील भागाचा चुराडा झाला. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे