देशात यंदा ३६७ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:36 AM2018-02-15T00:36:14+5:302018-02-15T00:41:07+5:30

अकोला : देशात यंदा ३६७ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन हाती येणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआयए) घे तलेल्या २0१७-१८ च्या वार्षिक आढाव्यात बांधला आहे. ऑक्टोबर  २0१७ पासून तर आतापर्यंतची पीक परिस्थितीच्या आकडेवारीतून ही नोंद  घेतली गेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आठ लाख कापसाच्या गाठी  कमी झाल्याचेदेखील सीआयएने अधोरेखित केले आहे.

367 lakh bales of cotton production this year! | देशात यंदा ३६७ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन!

देशात यंदा ३६७ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन!

Next
ठळक मुद्दे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआयए) ने घेतला २0१७-१८ चा  वार्षिक आढावाऑक्टोबर २0१७ पासून तर आतापर्यंतची पीक परिस्थितीच्या आकडेवारी तून घेतली नोंद 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशात यंदा ३६७ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन हाती येणार  असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआयए) घे तलेल्या २0१७-१८ च्या वार्षिक आढाव्यात बांधला आहे. ऑक्टोबर  २0१७ पासून तर आतापर्यंतची पीक परिस्थितीच्या आकडेवारीतून ही नोंद  घेतली गेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आठ लाख कापसाच्या गाठी  कमी झाल्याचेदेखील सीआयएने अधोरेखित केले आहे. मागील वर्षी ३७५  लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन देशभरात घेण्यात आले होते. त्या तुलनेत  मात्र यंदा आठ लाख गाठींची तूट जाणवत आहे. १७0 किलोनुसार का पसाची एक गाठ गणल्या जाते. सीआयएने काढलेल्या अंदाजात भौगोलिक  परिस्थितीचा अभ्यासही नोंदविला गेला आहे. यंदा अनेक ठिकाणी गुलाबी  बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकावर परिणाम झाला. सोबतच शास्त्रज्ञांच्या  मते   महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात अनेक ठिकाणी पीक हाती  येण्याआधी कापण्यात आले. पंजाब, हरियाणा, राजस्थानचा वरचा आणि  खालचा भाग, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू,  ओडिसा आदी ठिकाणांवरील कापूस पीक पेर्‍यातून उत्पादनाची तुलनात्मक  आकडेवारी सीआयएने काढली आहे.   ‘सीआयए’ने काढलेल्या अंदाज पत्रकानुसार हंगामासाठी एकूण ४१७ लाख गाठी होत्या. हंगामाच्या सुरुवा तीलाच ३0 लाख गाठींचे उत्पादनही झाले. सोबतच २0१७-१८ च्या चालू  वर्षात २0 लाख गाठींची आयात केली होती. राष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत वा परासाठी ३२0 लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे आणि सीआयएला ५५  लाख गाठींचे निर्यात अपेक्षित आहे. या हंगामाच्या अखेरीस ३0 सप्टेंबर ते  २0१८ पर्यंत सुमारे ४२ लाख गाठी अंदाजित आहेत.

Web Title: 367 lakh bales of cotton production this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस