मंदुरा येथे 22 वर्षीय तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 01:51 PM2018-09-06T13:51:04+5:302018-09-06T14:08:07+5:30

मुर्तिजापुर तालुक्यातील पोलीस स्टेशन माना अंतर्गत येत असलेल्या मंदुरा येथे 22 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.

22 Year Old Youth Murdered In Akola | मंदुरा येथे 22 वर्षीय तरुणाची हत्या

मंदुरा येथे 22 वर्षीय तरुणाची हत्या

Next

कुरूम (जि. अकोला) : मुर्तिजापुर तालुक्यातील पोलीस स्टेशन माना अंतर्गत येत असलेल्या मंदुरा येथे 22 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. मंदुरा येथील रामा चौके यांच्या घरासमोर मध्यरात्री ही घटना घडली.

शुभम देवानंद तेलमोरे असं तरुणाचं नाव असून तो मंदुरा येथील रहिवासी आहे. या तरुणावर चाकूने सपासप वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. माना पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी माना पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: 22 Year Old Youth Murdered In Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.