मराठवाड्यासाठी निळवंडेतून पाणी सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 03:10 PM2018-11-14T15:10:57+5:302018-11-14T15:11:07+5:30

निळवंडे धरणातून सुरु असलेले शेतीचे आवर्तन मंगळवारी रात्री संपताच त्याच पाण्याच्या धारेत आज सकाळी सहा वाजता २ हजार क्युसेक वेगाने जायकवाडीच्या दिशेने प्रवरा नदीपात्रातून पाणी झेपावले.

Water for the Marathawada has been released from the water | मराठवाड्यासाठी निळवंडेतून पाणी सुटले

मराठवाड्यासाठी निळवंडेतून पाणी सुटले

googlenewsNext

अकोले : निळवंडे धरणातून सुरु असलेले शेतीचे आवर्तन मंगळवारी रात्री संपताच त्याच पाण्याच्या धारेत आज सकाळी सहा वाजता २ हजार क्युसेक वेगाने जायकवाडीच्या दिशेने प्रवरा नदीपात्रातून पाणी झेपावले.
मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या माध्यमातून जायकवाडीला भंडारदरा - निळवंडेतून ३ हजार ८५० दशलक्षघनफुट पाणी देण्याच्या निर्णयानुसार २ हजार ८ दशलक्षघनफुट पाणी जायकवाडीला देण्यात आले. उर्वरीत १ हजार ७७० दशलक्षघनफुट पाणी आज सकाळी सोडण्यात आले आहे. १२ दिवस हे आवर्तन सुरु राहणार असून या काळात ओझर पिकअ‍ॅप वॉल बंधाऱ्याच्या पुढे सिंचन कालवे बंद करुन नदीपञातून पाणी प्रवाहीत राहणार आहे. नदीकाठावरील गावांना केवळ पाच तास वीज पुरवठा केला जाणार आहे.
सध्या निळवंडे धरणात ६ हजार ६७१ तर भंडारदरा धरणात ५ हजार ७८ दशलक्षघनफुट इतका पाणीसाठा आहे. भंडारदरातून १ हजार ५७४ क्युसेकने निळवंडेत पाणी येत असून निळवंडेतून २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात आले आहे.

 

Web Title: Water for the Marathawada has been released from the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.