शेतकऱ्याची डोक्यालिटी, बोअरवेलमधील मोटार काढण्याचे भन्नाट यंत्र बनवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:44 AM2022-02-18T10:44:39+5:302022-02-18T10:45:30+5:30

शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील शेतकऱ्याने बोअरवेलमधील मोटार (विद्युत पंप) काढण्यासाठीचे यंत्र घरीच बनवले. विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने ...

Tractor driven machine for removing electric pump from a bore well made by a farmer | शेतकऱ्याची डोक्यालिटी, बोअरवेलमधील मोटार काढण्याचे भन्नाट यंत्र बनवले

शेतकऱ्याची डोक्यालिटी, बोअरवेलमधील मोटार काढण्याचे भन्नाट यंत्र बनवले

Next

शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील शेतकऱ्याने बोअरवेलमधील मोटार (विद्युत पंप) काढण्यासाठीचे यंत्र घरीच बनवले. विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालत असल्याने कमी कष्टात आणि वेळेचीही बचत होते. अधिक उपयुक्त मूल्य असलेल्या या यंत्राला थोड्यात दिवसांत चांगली मागणी वाढेल असा विश्वास आत्माराम तोरमड यांना आहे.

भावीनिमगाव येथील प्रगतशील शेतकरी आत्माराम सखाराम तोरमड व त्यांचे संपूर्ण कुटुंब शेती व्यवसायात व्यस्त असते. पहिल्यापासूनच शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची तोरमड यांना आवड आहे. त्यांनी शेतीत केलेले अनेक प्रयोग परिसरातील शेतकरी वापरतात. मागील वर्षी त्यांनी बोअरवेलमधील मोटार काढण्यासाठीचे यंत्र आधुनिक पद्धतीने बनवले होते. त्याला जिल्हाभरातून खूप मोठी मागणी आहे. आता याच यंत्रात आणखी बदल करून या यंत्राला ट्रॅक्टर जोडून त्याच्या साहाय्याने बोअरवेलमधील मोटार कमी कष्टात सुलभरित्या वर काढता येते किंवा बोअरवेलमध्ये सोडताही येते. पारंपरिक यंत्राने १५० फूट खोलीवर असलेली मोटार काढण्यासाठी २ मजुरांना २ तास लागत होते. मात्र या आधुनिक यंत्राने हेच काम फक्त १५ मिनिटात एकच मजूर पूर्ण करत आहे.

तोरमड यांनी या यंत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यंत्राची मागणी वाढली असल्याने तोरमड यांनी आणखी यंत्र बनवण्याचे काम सुरू केले आहे. बनवलेल्या यंत्राचा पहिला ग्राहक सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील येथील आहे. वेगवेगळे प्रयोग करून शेतीतील अनेक कामे सुलभ झाली आहेत. या यंत्रामुळे बोअरवेलमधील मोटार काढण्याचे कष्टाचे व वेळखाऊ काम सोपे झाले आहे. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर हे यश मिळाले आहे.

-आत्माराम तोरमड,

प्रयोगशील शेतकरी, भावीनिमगाव

लेखक-नानासाहेब चेडे

१७ भावीनिभगाव

Web Title: Tractor driven machine for removing electric pump from a bore well made by a farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.