आज शाळेचा पहिला दिवस : ‘लोकमत’कडून विद्यार्थ्यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:36 PM2018-06-15T12:36:50+5:302018-06-15T12:36:50+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आज सुरू झाल्या असून ‘लोकमत’च्या वतीने शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. गुलाबपुष्प देऊन मुलांचे स्वागत केले जाणार आहे.

Today's School Day: Welcome to the students' Lokmat | आज शाळेचा पहिला दिवस : ‘लोकमत’कडून विद्यार्थ्यांचे स्वागत

आज शाळेचा पहिला दिवस : ‘लोकमत’कडून विद्यार्थ्यांचे स्वागत

googlenewsNext

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आज सुरू झाल्या असून ‘लोकमत’च्या वतीने शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. गुलाबपुष्प देऊन मुलांचे स्वागत केले जाणार आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या लालटाकी येथील महाराष्ट्र बालक मंदिरमध्ये मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. लोकमतचे उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशे, रामचंद्र दरे, विठ्ठल बुलबले यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
आज प्राथमिक शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. त्यानुसार शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना पुस्तकांचे समारंभपूर्वक वाटप केले.

Web Title: Today's School Day: Welcome to the students' Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.