दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक : राहाता पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:59 PM2018-05-17T18:59:56+5:302018-05-17T18:59:56+5:30

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना राहाता पोलिसांनी गुरूवारी पहाटे ताब्यात घेतले. अन्य तीन जण पळून गेले.

Three arrested for preparing for dacoity: | दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक : राहाता पोलिसांची कारवाई

दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक : राहाता पोलिसांची कारवाई

Next

राहाता : दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना राहाता पोलिसांनी गुरूवारी पहाटे ताब्यात घेतले. अन्य तीन जण पळून गेले.
याबाबत राहाता पोलीस ठाण्याचे कर्मचारी गोकुळदास लक्ष्मण पळसे यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुरूवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चितळी रस्त्यावरील पंधरा चारी येथे तीन संशयित हातात लोखंडी कत्ती, रॉड, गलोल घेऊन पहाटेच्या वेळेस येणाऱ्या जाणाºया वाहनास अडवून लुटमार करीत दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अजय सुनील कसबे (वय २०, भेर्डापूर), किरण भाऊसाहेब गायकवाड (वय २८, मालुंजा, ता. राहुरी), संदीप वसंता ठोकळ (वय २८, जडमोहल्ला, पाथर्डी )यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख पंचवीस हजार रूपये, पॅशन मोटारसायकल, लोखंडी कत्ता, रॉड ताब्यात घेतले. अन्य तीन जण पोलिसांना हुल देऊन पळून गेले. याबाबत राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फौजदार विशाल वाठोरे तपास करीत आहेत.

Web Title: Three arrested for preparing for dacoity:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.