कासारे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 06:57 PM2018-03-03T18:57:44+5:302018-03-03T18:57:44+5:30

कासारे (ता. पारनेर) येथील उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरात लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री ही घटना घडली.

Suicide by taking a young man in Kasara | कासारे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कासारे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

टाकळी ढोकेश्वर : कासारे (ता. पारनेर) येथील उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरात लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री ही घटना घडली.
बाबुनाथ मालूजी दातीर (वय २८, रा. कासारे, ता.पारनेर) हे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वडील झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. बाबुनाथ याने एमसीएम पदवी प्राप्त केली होती. तो काही वर्षे श्री ढोकेश्वर माध्यमिक विद्यालयात संगणक शिक्षक म्हणून सेवेत होता. गेल्या तीन महिन्यापासून तो पुणे येथे कामानिमित्त गेला होता. होळी सणासाठी तो गुरुवारी सायंकाळी गावाला आला होता. रात्री त्याने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येपूर्वी त्याने आई, वडिलांना चिट्ठी लिहून ठेवली. मी जे केले आहे ते मी स्वखुषीने करीत आहे. याला मी कोणालाच जबाबदार ठरवत नाही. कृपा करून आपणही कुणाला जबाबदार धरू नका. मी आयुष्यात खूप वेळा अपयशी झालो. या अपयशाच्या निराशेतून मी हे करीत आहे. त्यामुळे आपण कुणालाही जबाबदार ठरवू नका, असा चिठ्ठीतील मजकूर आहे.
याबाबत बाबुनाथ याचे चुलते कोंडीबा दातीर यांनी टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्रला फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर बाबुनाथ याचा मृतदेह शुक्रवारी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, सहाय्यक फौजदार अशोक भोसले,पोलीस नाईक संतोष शेळके, पो.कॉ. निवृत्ती साळवे, पो.कॉ. शरद पवार करीत आहेत.

Web Title: Suicide by taking a young man in Kasara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.